Maharashtra Breaking News LIVE: ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना अखेर जामीन मंजूर

Maharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर 

Maharashtra Breaking News LIVE: ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना अखेर जामीन मंजूर

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात आता पावसाने थोडी उसंत घेतली आहे. तर एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाने कंबर कसली आहे. नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर

12 Aug 2024, 13:21 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: बीड जिल्ह्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख रविराज बडे आणि गजानन कदम त्याचबरोबर महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थानी शिवसेना शिंदे या पक्षात प्रवेश करणार आहेत

12 Aug 2024, 12:56 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: सफाई कामगारांचं काम बंद आंदोलन, महापालिका मुख्यालयावर  धडक

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील कंत्राटी सफाई कामगारांनी आज काम बंद आंदोलन केलंय.महापालिका हद्दीतील २७ गावांमधील जवळजवळ ४५० सफाई कामगार या आंदोलनात सहभागी झालेत.

12 Aug 2024, 12:26 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांची बैठक बोलवावीः शरद पवार

मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांची बैठक बोलवावी. विरोधी पक्षाच्या वतीने आम्ही त्या बैठकीत हजर राहू. मराठा आणि ओबीसी आंदोलनाच्या नेत्यांना बोलवावे. संयुक्त बैठकीतून आरक्षणाचा प्रश्नावर मार्ग काढावा. 50 टक्केच्या वर आरक्षण देण्यासाठी धोरणात बदलण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. समाजातील समंज्यास्य टिकवणे गरजेचे आहे

12 Aug 2024, 11:28 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: तो पर्यंत पूजा खेडकरला अटक करु नका, न्यायालयाचे निर्देश

पूजा खेडकर प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. हे प्रकरण विचाराधीन असताना तिला अटक करू नये, असे निर्देश न्यायालयाने तपास यंत्रणेला दिले आहेत. तत्काळ अटक करणे आवश्यक नाही. 21 ऑगस्टला या प्रकरणी सविस्तर सुनावणी होणार

12 Aug 2024, 10:59 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: विधानसभेसाठी पक्षाची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावरः सूत्र

विधानसभेच्या जागा निश्चितीचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मतदारसंघात फेरबदल करण्याचेही अधिकार देवेंद्र फडणवीसांवर सोपवण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

12 Aug 2024, 10:51 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: 'महाराष्ट्रात भाजपाने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात'

महाराष्ट्रात भाजपाने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत जागा वाटप आणि विधान सभेची रणनीती यावर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निहाय मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते त्याचप्रमाणे सर्वेक्षण अहवाल याच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार.

12 Aug 2024, 10:09 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे सुपारीबाजः संजय राऊतांची टीका

मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे हे शिंदेचे भाडोत्री आहेत. ते सुपारीबाज आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. 

12 Aug 2024, 09:23 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात बनावट तिकिटाच्या माध्यमातून विमानतळात घुसण्याचा दोघांचा प्रयत्न

पुण्याच्या लोहगाव एअरपोर्ट वरून सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास बनावट तिकिटाच्या आधारे पुणे ते लखनऊ इंडिगो कंपनीच्या विमानात या दोन्ही संशयताने घुसून विमान प्रवास करण्याचा केला प्रयत्न. या दोघांनी बेकायदेशीर रित्या एअरपोर्टवर घुसण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात एअरपोर्ट पोलिसांनी त्यांना अटक केली आहे

12 Aug 2024, 09:23 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या घराबाहेर आज 'जवाब दो आंदोलन'

पुण्यातील मोदी बाग या शरद पवारांच्या निवासस्थानाबहेर मराठा समाजाकडून निदर्शने करण्यात येणार आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार असून मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

12 Aug 2024, 08:30 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ, पोलीस अलर्ट मोडवर

अजित पवार यांची जनसमान यात्रा सुरू आहे. अजित पवार आज मालेगाव, धुळे आणि जळगाव दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या गुप्तवार्ता विभागामार्फत अजित पवारांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनेनंतर पोलीस अलर्ट मोडवर आहेत. त्यानंतर अजित पवारांच्या सुरक्षित मोठी वाढ करण्यात आली आहे.