Maharashtra Breaking News LIVE: ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना अखेर जामीन मंजूर

Maharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर 

Maharashtra Breaking News LIVE: ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना अखेर जामीन मंजूर

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात आता पावसाने थोडी उसंत घेतली आहे. तर एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाने कंबर कसली आहे. नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर

12 Aug 2024, 22:49 वाजता

 शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मालेगाव व रेणुका देवी सोसायटी कोट्यवधींचे आर्थिक फसवणूक प्रकरणी ते अटकेत होते. अद्वय हिरे यांच्या जवळच्या नातेवाईकांनी मिळून जवळपास 7 कोटी रुपयांची जामीन बँकेला तारण ठेवली असा त्यांच्यावर आरोप होता. तब्बल 9 महिन्या नंतर हिरे यांना जामीन मंजूर झालाय.

12 Aug 2024, 20:02 वाजता

 पेसा अंतर्गत भरती संदर्भात नाशिक मधील सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, माजी आमदार जे पी गावित, आमदार हिरामण खोसकर यांनी आदिवासी आयुक्त कार्यालयात बैठक घेतली . बैठकीनंतर माजी आमदार गावित यांनी 21 ऑगस्टपर्यंत सरकारला अल्टीमेटम दिलाय... आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पेसाभरती अंतर्गत असलेल्या 13 जिल्ह्यांमध्ये शासकीय कार्यालय बंद करण्याचा इशारा दिलाय 

12 Aug 2024, 19:23 वाजता

चंद्रपुरात कुख्यात गुंड हाजी सरवर याचा गोळीबारात मृत्यू झाला तर त्याचा एक साथीदार शिवा 2 गोळ्या लागल्याने जखमी झालाय. हाजीवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात चिकित्सा कक्षात उपटार सुरु होते. पण उपचारादरम्यान हाजीचा झाला मृत्यू झाला. आपल्या 4 साथीदारांसह हाजी सरवर हॉटेल शाही दरबार इथं जेवणासाठी गेला होता. गुंड टोळ्यांच्या वर्चस्वाच्या संघर्षातुन हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 
या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात  मोठा तणाव निर्माण झाला होता.

 

12 Aug 2024, 17:58 वाजता

आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आरक्षणाच्या भूमिकेला आमचं सहकार्य असेल. बैठकीला जरांगे, भुजबळांनाही बोलवण्याची मागणी पवारांनी केलीय. तसंच
50 टक्क्यांवर मर्यादा वाढवण्याचे अधिकार केंद्राला आहेत. त्यामुळे राजकीय मतभेद न करता केंद्राने पुढाकार घेऊन यावर मार्ग काढण्याचं आवाहन पवारांनी केलंय. 

12 Aug 2024, 15:56 वाजता

पेसा भरती झालीच पाहिजे या मागणीसाठी आदिवासी बांधव आक्रमक झाले. भेटीसाठी आलेल्या माजी मंत्री भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, हिरामण खोसकर आणि माजी महापौर रंजना भानसी यांना आंदोलकांनी घेराव घातला. तसंच सरकारविरोधात गो बॅकच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर गेल्या बारा दिवसांपासून आदिवासींचं बेमुदत उपोषण सुरू आहे. मात्र याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतलीय.

12 Aug 2024, 15:04 वाजता

मोगलांना जसे संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसा मी दिसतो. महायुतीचं सरकार झालं हे त्यांना अजून हजम होत नाही. त्यांना बसता उठता, झोपेतही मीच दिसतो. ते सांगायचे सरकार पडेल आता २ वर्ष होऊन गेली. सरकार मजबुतीने उभं आहे. जे घटनाबाहय सरकार म्हणता, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात ते योजनचे बॅनर कसे लावतात. हे दुट्टपी आहेत. यांना फक्त घेण माहित आहे देण नाही. आमचं सरकार देणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.

12 Aug 2024, 14:19 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: नागपूर: वाडी- हिंगणा मार्गावरील टोल नाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला 

शहराच्या तीस किलोमीटरच्या परीसरात टोल नको  असा नियम असताना तसेच हिंगणा तालुक्यात 10 किलोमीटर परिसरात 3 टोलनाका  असल्याचा आरोप करत मनसेचे आक्रमक आंदोलन

12 Aug 2024, 13:28 वाजता

Breaking News Live Update : पालिका कर्मचारी लिफ्टमध्ये अडकले 

पिंपरी चिंचवडमध्ये अ प्रभाग कार्यालयात लिफ्ट मध्ये अडकले वीस मिनिटे जनसंवादासाठी आलेले नागरिक. यामध्ये शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, चंद्रकांत दादा लोंढे, गणेश दराडे,श्रीराज अन्सारी, आदी नागरिक होते.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पाचही नागरिक घामाघुम झाले. सुरक्षारक्षक बेजबाबदार हसत होते त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.

12 Aug 2024, 13:24 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: महापालिका आयुक्तांच्या गाडीवर गटारीचे पाणी फेकत भीम आर्मीचे आंदोलन

सोलापुरात महानगरपालिका आयुक्तांच्या गाडीवर टाकण्यात आलं ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी. सोलापूर शहरातील भीम आर्मी पदाधिकाऱ्यांचा आंदोलन.

12 Aug 2024, 13:22 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पिंपरी चिंचवड शहरात खड्ड्यांचं साम्राज्य; महापालिकेचा दावा फोल

पिंपरी चिंचवड शहरामध्ये सतत सुरू असलेल्या संततधार तर कधी मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. शहराच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात रस्त्यांवर खड्डे आढळून येत आहेत.