Maharashtra Breaking News LIVE : मुंबईतल्या शिवसेनेच्या नेत्यांसोबत जयंत पाटील यांची बैठक

Maharashtra Breaking News LIVE : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांनी राजकीय दौरे सुरू केले आहेत. राज्यासह देश-विदेशातील इतर घडामोडींचा आढावा जाणून घेऊया. 

Maharashtra Breaking News LIVE : मुंबईतल्या शिवसेनेच्या नेत्यांसोबत जयंत पाटील यांची बैठक

21 Aug 2024, 21:08 वाजता

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवालय मध्ये. मुंबईतल्या काही मतदारसंघाबाबत चाचणी सुरू असल्याची माहिती.‌ मुंबईतल्या शिवसेनेच्या नेत्यांसोबत जयंत पाटील यांची बैठक. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा सुरू. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि इतर नेते उपस्थित.

21 Aug 2024, 19:52 वाजता

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या घराची झाली तोडफोड करण्यात आली आहे. गावातील लोकांनीच परिवाराला गावा  बाहेर काढले आहे. तर, अज्ञात लोकांनी घराची तोडफोड केली आहे. 

21 Aug 2024, 18:57 वाजता

शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  शरद पवार यांच्याशी केंद्र सरकारच्या वरिष्ठ सुरक्षा व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे.  यावेळी शरद पवार यांनी CRPF ची सुरक्षा स्वीकारली आहे. यापूर्वी असलेली राज्य सरकारची z+ सुरक्षा सुद्धा सोबत असेल. तसेच CRPF चे 10 जवान त्यांच्या सोबत राहणार आहेत. 

21 Aug 2024, 17:45 वाजता

बदलापूरमधील एका नामांकित शाळेत चिमुरड्यांवर अत्याचार झाला. या घटनेच्या निषेधार्थ काल पालकांनी बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. याप्रकरणी SIT टीम स्थापन करण्यात आलीय. या टीमकडून दोन्ही पीडितांच्या घरी जाऊन दोघींच्याही पालकांचा जबाब नोंदवण्यात आला. 

21 Aug 2024, 15:08 वाजता

बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय...विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलंय...मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच काँग्रेसनं आंदोलन केलंय...पोलीस आणि आंदोलन कर्त्यांमध्ये झटापटही झाली...

21 Aug 2024, 14:31 वाजता

Badlapur Breaking News LIVE :  'जनतेच्या पैशांमधून स्वत:चं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा...'; राज ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

बातमी सविस्तर वाचा - 'बहीण खरंच लाडकी असेल तर..', राज ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या..'

 

21 Aug 2024, 12:49 वाजता

Maharashtra Breaking News LIVE :  सोलापूर  रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वे गाडीत चढताना प्रवाशाचा तोल जाऊन तो खाली पडला... पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा जीव वाचला. गार्डने तात्काळ ब्रेक मारला आणि गाडी थांबवली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हा सर्व थरार स्थानकातल्या सीसीटीव्ही कॅमे-यात चित्रित झालीय. 

21 Aug 2024, 12:49 वाजता

Maharashtra Breaking News LIVE :  सांगलीचे खासदार विशाल पाटीलांचं सुहास बाबर यांना महाविकास आघाडीचे निमंत्रण

सुहास बाबर यांना महाविकास आघाडीत येण्याचं निमंत्रण दिलंय...महायुतीचे शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार सुहास बाबरांना पाठिंबा दिल्याचं वक्तव्य विशाल पाटीलांनी केलं होतं...त्यामुळे महायुतीला पाठिंबा देत असल्याची चर्चा होती... आता त्याबाबत विशाल पाटीलांनी खुलासा केलाय...महायुतीला आपला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा नसून याउलट सुहास बाबर यांना महाविकास आघाडीत खानापूर -विटा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपण निमंत्रण दिल्याचे खासदार विशाल पाटील यांनी स्पष्ट केलंय... त्यामुळे सुहास बाबर महाविकास आघाडीमध्ये सामील होणार का ? अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरूये..

 

21 Aug 2024, 12:14 वाजता

Pune Breaking News LIVE : पुण्यात आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुण्यात अजून एक अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाबा म्हणजे अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिचावर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. महत्त्वाचं म्हणजे सगळे मित्र आहेत. मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांचा शोध सुरु आहे. 

 

21 Aug 2024, 11:45 वाजता

Badlapur Breaking News LIVE : अकोल्यात शिक्षकाकडून 6 विद्यार्थीनींचा विनयभंग 

अकोल्यात एका शिक्षकानं 6 विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय..पोलिसांनी या प्रकरणी प्रमोद सरदार या शिक्षकाला अटक केलीये.. त्याच्यावर पॉस्कोसह विविध गुन्हे नोंदवण्यात आलेत.. हा शिक्षक 8वीच्या वर्गातील मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांना स्पर्श करत होता..

सविस्त बातमी वाचा - बदलापूर, पुणेनंतर अकोला; वर्गशिक्षकाने सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवल्या, अन्...