21 Aug 2024, 11:23 वाजता
Badlapur Breaking News LIVE : अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
बदलापुरातील चिमुकल्यांवर अत्याचार करणा-या अक्षय शिंदे या मुख्य आरोपीची पोलीस कोठडी आज संपली.. त्यामुळे आज त्याला कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं... त्याला पुन्हा 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.. बदलापुरातील नामांकीत शाळेतील दोन चिमुकल्यांवर अक्षयनं लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय..
21 Aug 2024, 11:22 वाजता
Badlapur Breaking News LIVE : बदलापुरातील 'ती' शाळा भाजपशी संबंधित - संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त केलाय. बदलापुरातील 'ती' शाळा भाजपशी संबंधित असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. फडणवीसांच्या तोंडी SIT शब्द शोभत नाही अशीही टीका त्यांनी केली. इतकंच नाही तर कालच्या घटनेची दखल सुप्रीम कोर्टाने का घेतली नाही? 'रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांना तुम्ही गुन्हेगार ठरवता का?' असा संतप्त सवालही राऊतांनी उपस्थित केलाय.
21 Aug 2024, 11:21 वाजता
Badlapur Breaking News LIVE : लाडकी बहिण योजना विरोधकांच्या जिव्हारी लागल्यामुळंच बदलापूरचं आंदोलन... - मुख्यमंत्री
बदलापुरात झालेलं आंदोलन राजकीय दृष्या प्रेरित असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी केलाय.. 8-9 तास आंदोलन सुरू होतं त्याला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप त्यांनी केलाय.. स्थानिक कमी होते आणि इतर ठिकाणावरून गाडी भरूल लोकं आंदोलनासाठी आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय..
सविस्तर बातमी वाचा - Badlapur School Crime: 'लाडकी बहीण योजना जिव्हारी लागल्याने बदलापूर आंदोलन'; CM विरोधकांवर संतापले
21 Aug 2024, 09:42 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : नागपुरात भारत बंदच्या पार्श्वभूमीवर काय आहे परिस्थिती?
नागपुरात आरक्षण बचाव कृती समितीने भारत बंदच्या हाकेला समर्थन देत संविधान चौकात 11 वाजेपासून धरणे आंदोलन करणार आहे... अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला असून काँग्रेस नेते नितीन राऊत यांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे... आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीसही अलर्ट मोडवर आहेत
21 Aug 2024, 09:34 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : बदलापूर, पुण्यानंतर आता नाशिक हादरलं
बदलापूरची घटना ताजी असतांना चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांनी नाशिक जिल्हाही हादरला.....नाशिकच्या सिन्नरमध्ये एका साडेचार वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आलेत.. वावी गावात ही घटना घडलीय.. पोलिसांनी चिमुकलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली असून आरोपीला अटक केलीये.. तर वडणेर भैरव इथं एका 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण करुन त्याच्यावर अत्याचार करण्यात आलेत.. या प्रकरणातील आरोपीलाही पोलिसांनी अटक केलीये.. तर तिसरी घटना चांदडमध्ये घडली असून दोन अल्पवयीन मुलींचं चांदवडमधून अपहरण करण्यात आलंय.. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत...
21 Aug 2024, 08:22 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : आज भारत बंदची हाक
Bharat Bandh : दलित आणि आदिवासी संघटनांकडून आज (21 ऑगस्ट 2024) भारत बंदची हाक देण्यात आलीय. या आंदोलनामध्ये बसपा, चंद्रशेखर आझादची पार्टी सहभागी घेतलाय. एसटी अंतर्गत वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे ही बंदची हाक देण्यात आलीय.
बातमी सविस्तर वाचा - Bharat Bandh : आज भारत बंद! काय सुरू आणि काय ठप्प? घरातून बाहेर पडण्यापूर्वी पाहा महत्त्वाची माहिती
21 Aug 2024, 08:19 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : उद्या कोल्हापुरात सरकारच्या लाडकी बहिण योजनेचा मेळावा
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर होणारी महायुतीची प्रचार यात्रा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये... राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रचार यात्रेच्या नियोजनात बदल करण्यात आलाय. त्यामुळे सध्या लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमांवर भर देण्याची भूमिका महायुतीच्या नेत्यांनी घेतलीय. या पार्श्वभूमीवर उद्या कोल्हापुरात सरकारच्या लाडकी बहिण योजनेचा मेळावा होणारेय. 20 ऑगस्टपासून महायुतीच्या प्रचार यात्रेला सुरुवात होणार होती. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महायुतीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित होते.
21 Aug 2024, 08:17 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : मविआची आज महत्त्वाची बैठक
मविआची आज महत्त्वाची बैठक होणारेय... महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे महत्त्वाचे नेते या बैठकीला हजर राहणार आहेत. या बैठकीत विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा होणारेय. तसंच मुख्यमंत्रिपदासाठीच्या चेहरा निवडीवरही बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय.
21 Aug 2024, 08:15 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्षाचं आज राज्यभर निषेध आंदोलन
Badlapur Update : बदलापुरात चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्षाचं आज राज्यभर निषेध आंदोलन करणार आहेत. सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात बदलापूरमध्ये ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे.
21 Aug 2024, 08:13 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : बदलापूर रेल रोको प्रकरणी 32 आंदोलकांना अटक
Badlapur Update : बदलापूर रेल रोको प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून 32 आंदोलकांना अटक केलीय. तर 300 ते 400 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बदलापुरात आज इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. बदलापुरात चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काल पालक आणि बदलापूरकरांचा उद्रेक पाहायला मिळाला होता... बदलापूरकरांनी रेल्वे रुळांवर उतरवून लोकल सेवा नऊ तास रोखून धरली होती, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केलं होतं... आज मात्र बदलापूर रेल्वे स्टेशनची परिस्थिती सामान्य असल्याचं दिसतंय.. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.