Maharashtra Breaking News LIVE: मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर पेसा मुद्यावरून सुरू असलेले आदिवासींचे आंदोलन मागे

Maharashtra Breaking News LIVE:  राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.

 Maharashtra Breaking News LIVE:  मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर पेसा मुद्यावरून सुरू असलेले आदिवासींचे आंदोलन मागे

Maharashtra Breaking News LIVE: मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.

29 Aug 2024, 21:51 वाजता

मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर पेसा मुद्यावरून सुरू असलेले आदिवासींचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.  15 सप्टेंबरपर्यंत कोर्टात निर्णय व्हावा अशी आदिवासी शिष्टमंडळाची अपेक्षा आहे.  सरकार न्यायालयात आग्रही पध्दतीने बाजू मांडणार आहे.  एजी आणि सीनिअर कौन्सिलशी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. 

29 Aug 2024, 18:33 वाजता

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत.  पालघरमध्ये सुमारे 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण पोर्ट प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार आहे. वाढवण हे भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या बंदरांपैकी एक असेल. हे बंदर भारताच्या सागरी संपर्काला वाढवेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून भारताची भूमिका अधिक मजबूत करेल.  पंतप्रधान 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्य प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील करतील. 
व्हेसल कम्युनिकेशन आणि सपोर्ट सिस्टीमच्या राष्ट्रीय विस्तारांतर्गत, 13 किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील यांत्रिक आणि मोटारीकृत मच्छीमार नौकांवर 1 लाख ट्रान्सपोंडर स्थापित केले जातील. पंतप्रधान मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 ला संबोधित करतील. 

29 Aug 2024, 17:19 वाजता

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली आहे. विरोधकांनाही त्यांनी राजकारण न करण्याचं आवाहन यावेळी केले. त्याचबरोबर सर्व परिस्थितीसह वातावरणाचा अभ्यास करून लवकरातलवकर भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

29 Aug 2024, 13:31 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: राहुल गांधी 5 सप्टेंबर रोजी सांगलीत येणार

 पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे आणि स्मारकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रमानिमित्त राहुल गांधी सांगलीत येणार आहेत. पलूस कडेगाव विधानसभा मतदार संघात कार्यक्रम ५ सप्टेंबरला पार पडणार आहे.

29 Aug 2024, 13:02 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ताफा अडविण्याचा प्रयत्न

अजित पवार यांच्या सन्मानयात्रेत बीडमध्ये राडा. स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठेवीदारांचे पैसे बुडवणाऱ्या बँकेवर कारवाई करण्याची मागणी. सचिन उबाळे यांना पोलिसांकडून केली अटक 

29 Aug 2024, 12:46 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात दहशतवाद विरोध पथकाची मोठी कारवाई

पुणे गणेश उत्सव पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाची पुण्यात मोठे कारवाई पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंज वर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा

29 Aug 2024, 11:58 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: शिवाजी महाराज पुतळा घटना दुर्दैवी, अजित पवार यांनी माफी मागितली. आदर दाखवण्यासाठी आम्ही मूक आंदोलन करत आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

29 Aug 2024, 11:55 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार, आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू

दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. तर,गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे आणखी १९ जणांचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे गेल्या तीन दिवसांतील मृतांची संख्या 30 झाली आहे.

29 Aug 2024, 11:55 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार, आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू

दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. तर,गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे आणखी १९ जणांचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे गेल्या तीन दिवसांतील मृतांची संख्या 30 झाली आहे.

29 Aug 2024, 11:51 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पूजा खेडकरला दिलासा, 5 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण

बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरला न्यायालयाने दिलासा दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाकडून ५ सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. पूजा खेडकर अटकपूर्व जामीनावर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली