Maharashtra Breaking News LIVE: मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर पेसा मुद्यावरून सुरू असलेले आदिवासींचे आंदोलन मागे

Maharashtra Breaking News LIVE:  राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.

 Maharashtra Breaking News LIVE:  मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर पेसा मुद्यावरून सुरू असलेले आदिवासींचे आंदोलन मागे

Maharashtra Breaking News LIVE: मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.

29 Aug 2024, 08:07 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: यंदा गणेश विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव

यंदा गणेश विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव; गेल्या ११ वर्षांत कृत्रिम तलावातील गणेशमूर्ती विसर्जनात ३७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

29 Aug 2024, 08:05 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: एच पश्चिम विभागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

महानगरपालिकेच्या एच पश्चिम विभागातील पाली हिल जलाशय १ ची जुन्या, जीर्ण झालेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. परिणामी, एच पश्चिम विभाग कार्यालयाच्या हद्दीतील काही परिसराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

29 Aug 2024, 08:02 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: आनंदाचा शिधा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

सणासुदीला आनंदाचा शिधा देण्यासाठी राज्य सरकारने निविदा काढल्या होत्या. मात्र यातून एकाच ठेकेदारांचे उकळ पांढरे करण्यासाठी अटी शर्थी बदलण्यात आल्याचा आरोप करीत इंडो अलाईड आणि जस्ट युनिव्हर्सल या दोन ठेकेदार कंपन्यांनी मुंबई उच्च न्यायालयात या निविदेला आव्हान दिले होते. त्यासंदर्भात आज सुनावणी होणार आहे.