Maharashtra Breaking News LIVE: मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
29 Aug 2024, 11:38 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी फॉरेन्सिकची टीम राजकोट किल्ल्यावर
सिंधुदुर्गातील फॉरेन्सिक टीम नंतर आता कोल्हापूर येथील फॉरेन्सिक टीम घटनास्थळाची पाहणी. गेल्या अर्ध्या तासापासून फॉरेन्सिक टीम राजकोट किल्ल्यावर
29 Aug 2024, 11:22 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: ऑनलाइन पासपोर्टची वेबसाइट 5 दिवसांसाठी बंद
पासपोर्ट विभागाची वेबसाइट पुढील पाच दिवसांसाठी बंद असणार आहे. या काळात आधीच घेतलेल्या सर्व अपॉइंटमेंट पुन्हा शेड्युल करण्यात येणार आहेत. तांत्रिकी कारणांमुळं पाच दिवस वेबसाइट बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
29 Aug 2024, 10:44 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (AP) पक्षाचे आंदोलन
शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा लवकरात लवकर उभारावा यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. तसंच, पुतळ्याच्या उभारणीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई मागण्या राष्ट्रवादीने केल्या आहेत.
29 Aug 2024, 10:25 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: तुळजाभवानी सोने चांदी अपहार प्रकरणी सीआयडीचा अहवाल प्राप्त
सोन्यातुळजाभवानी सोने चांदी अपहार प्रकरणी सीआयडीचा अहवाल अखेर जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालाय. त्यामुळे आरोपींवर आता गुन्हे दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही गुन्हे दाखल न झाल्याने हिंदू जनजागृति समितीने उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस काढत गुन्हे दाखल करण्याविषयी विचारणा केली होती.
29 Aug 2024, 10:01 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: पुणे शहरातील तब्बल एक हजार सीसीटीव्ही बंद
ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना, पुण्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून महापालिकेने पुण्यात २ हजार ९०९ सीसीटीव्ही बसविले मात्र, यातील १ हजार ५४ सीसीटीव्ही बंद आहेत. महापालिकेच्या विद्युत विभागाने लावण्यात आलेल्या २ हजार ९०९ सीसीटीव्ही पैकी १ हजार ८५५ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत.
29 Aug 2024, 09:25 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: UPSC उमेदवारांची आता आधारशी पडताळणी केली जाणार
केंद्र सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) नोंदणी, परीक्षा आणि भरतीच्या विविध टप्प्यांच्या वेळी ऐच्छिक आधारावर उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार प्रमाणीकरण वापरण्याची परवानगी दिली.
29 Aug 2024, 09:01 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: आचरेकर सरांचे स्मारक शिवाजी पार्कवर उभं राहणार
फलंदाज सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मारकाच्या प्रस्तावाला महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाने बुधवारी मंजुरी दिली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या GR मध्ये शिवाजी पार्कच्या गेट ५ जवळ १.८ मीटर क्यूब स्ट्रक्चर उभारण्याची योजना आहे. या स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी बी. व्ही. कामत मेमोरियल क्रिकेट क्लबकडे देण्यात आली आहे आणि त्यासाठी सरकारकडून कोणतेही आर्थिक योगदान दिले जाणार नाही.
29 Aug 2024, 08:11 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात गुंडांची दहशत, अरण्येश्वर भागात वाहनांची तोडफोड
पुण्यातील अरण्येश्वर भागात गुंडाकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. सात ते आठ चार चाकी गाड्यांची तोडफोड केली आहे. रात्रीच्या वेळी तोडफोड झाल्याची माहिती असून दहशत निर्माण करण्याच्या हेतूने तोडफोड केल्याची माहिती आहे. पोलिसांकडून अरण्येश्वर भागातील अनेक सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे
29 Aug 2024, 08:09 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हायकोर्टाचा दिलासा
मुंबईसह राज्यभरातील गणेशोत्सव मंडळांना उच्च न्यायालयाने बुधवारी मोठा दिलासा दिला. मोकळ्या जागेवर मंडप उभारणीला परवानगी देण्यास विरोध करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली. मंडप उभारणीला मनाई करणारी तरतूद कुठल्या कायद्यात आहे? तसा कायदाच नाही. असे असताना तात्पुरत्या मंडप उभारणीला कुठल्या हक्काने विरोध करताय, असा सवाल करीत न्यायालयाने याचिकाकर्त्याला फैलावर घेतले.
29 Aug 2024, 08:08 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जन सन्मान यात्रा आज बीड जिल्ह्यात
बीड जिल्ह्यातील बीड विधानसभा मतदारसंघ आणि आष्टी विधानसभा मतदारसंघामधून ही यात्रा जाणार आहे बीड शहर आणि आष्टी शहरांमध्ये दोन ठिकाणी उद्या या यात्रेदरम्यान जाहीर सभा ही होणार आहेत.