Maharashtra Breaking News LIVE: अमित शाहांचं 'मिशन मुंबई', दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यात बैठकींचा धडाका

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील व देश-विदेशातील ठळक घडामोडींचा आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या 

Maharashtra Breaking News LIVE:  अमित शाहांचं 'मिशन मुंबई', दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यात बैठकींचा धडाका

Maharashtra Breaking News LIVE: देशासह राज्यात मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन झाले आहे. राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतेय. तसंच, राज्यातील राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. जाणून घेऊया राज्यातील ठळक घडामोडींचा आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

8 Sep 2024, 16:08 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: अभिनेत्री सई ताम्हणकरने लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन

अभिनेत्री सई ताम्हणकरने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. सध्या ती तिच्या आगामी 'मानवत मर्डर्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या निमित्तानं बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी ती तिथे पोहोचली होती.

8 Sep 2024, 16:04 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: नवनीत राणा आणि रवी राणा यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

आमदार रवी राणा आणि माझी खासदार नवनीत राणा यांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.

8 Sep 2024, 14:19 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: गणेशोत्सवात पहिल्या दिवशी लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी अर्पण केलेल्या दानाची आजपासून मोजदात सुरू आहे. सर्व प्रथम लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी दान केलेल्या रोख रुपयांची मोजदात केली जाणार आहे. त्यानंतर लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी सोने आणि चांदीचे दागिणे अर्पण केले आहे त्यांची मोजदात केली जाणार आहे

 

8 Sep 2024, 13:44 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: एकदा बारामतीचा आमदार बदलला तर तुम्हाला कळेल: अजित पवार

आपल्या भागाचा कायापालट करण्यासाठी अर्थ विभाग आपल्याकडे  आहे तो उपयोगी पडला. विकास करून दाखवण्याची हिंमत आणि धमक आपल्यात आहे हे देखील मतदारांना सांगावे लागेल. एकदा बारामतीचा आमदार बदलला तर तुम्हाला कळेल,  असे अजित पवारांनी म्हणताच कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या आहेत. तुम्हाला न सांगता इतका विकास करतोय, माझा बारामतीचा विकास करत असताना कुठलाही स्वार्थ नाही, असंही पवारांनी म्हटलं आहे. 

8 Sep 2024, 13:08 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: दरोडेखोरांच्या मारहाणीत शेतकऱ्याची हत्या, गावकरी आक्रमक

हमदनगरच्या तिसगाव येथील भडके वस्तीवर दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत मच्छिंद्र ससाने यांचे हत्या झाली या घटनेच्या निषेधार्थ तिसगाव येथील ग्रामस्थांनी गावबंदचे आवाहन केलं होतं माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत आज तिसगाव येथे मोर्चा काढून गाव कडकडीत बंद ठेवण्यात आलं आणि घटनेच्या निषेधार्थ सभा घेण्यात आली या सभेत ससाने यांच्या खुनाचा तपास पोलिसांनी सात दिवसात लावावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे 

8 Sep 2024, 12:33 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश 

 

8 Sep 2024, 12:22 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: 'कृषीमंत्री चांगलं काम करत असतील तर त्यांचं कौतुक का करु नये'

धनंजय मुंडे यांच्यासोबत आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत मध्यरात्री चर्चा झाली, अस जरांगे यांनी म्हटलंय. रात्री 3 नंतर मुंडे यांनी अंतरवाली सराटी येथे येऊन भेट घेतली. माझी भेट घेण्यासाठी कुणीही अंतरवालीत येऊ शकतो असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं. कृषिमंत्री चांगलं काम करत असतील तर त्यांचं कौतुक का करु नये, चुकल्यावर त्यांना सोडणार देखील नाही असा चिमटा देखील जरांगे यांनी काढला आहे.  मी जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांशिवाय कुणाचाही होऊ शकत नाही. असंही जरांगे म्हणाले

8 Sep 2024, 11:56 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाकडुन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीचे पंचनामे सुरू 

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन,उडीद,मुग,ज्वारी,फळबागा,भालेभाज्या चे मोठे नुकसान झाले असुन या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करावे आशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडुन नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. तलाठी,मंडळाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान नुकासानीचे पंचनामे पुर्ण करून लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणीही शेतकऱ्यांतुन केली जात आहे.

8 Sep 2024, 11:34 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: ऋषी पंचमीनिमित्त रामकुंडावर महिलांची स्नानासाठी गर्दी

ऋषिपंचमीनिमित्त नाशिकच्या रामकुंड परिसरात महिलांनी स्नान करण्यासाठी गर्दी केलीये... सकाळपासूनच हजारो महिलांची रामकुंड परिसरात स्नान करत आहे...हिंदू धर्मात ऋषीपंचमीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. यंदा हे व्रत 8 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच आज पाळले जात आहे. हा दिवस सात ऋषींना समर्पित आहे.

8 Sep 2024, 10:39 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: नदीपात्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

नागपूर जिल्हातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या महादूला येथे सुरु नदीत पोहण्याच्या मोहात दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. वृषभ राजेंद्र गाडगे आणि रोहन सुभाष साऊसाखडे अशी मृतक मुलांची नावे आहेय. ते दोघेही इयत्ता ८ व्या वर्गात शिकत होते