Maharashtra Breaking News LIVE: अमित शाहांचं 'मिशन मुंबई', दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यात बैठकींचा धडाका

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील व देश-विदेशातील ठळक घडामोडींचा आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या 

Maharashtra Breaking News LIVE:  अमित शाहांचं 'मिशन मुंबई', दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यात बैठकींचा धडाका

Maharashtra Breaking News LIVE: देशासह राज्यात मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन झाले आहे. राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतेय. तसंच, राज्यातील राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. जाणून घेऊया राज्यातील ठळक घडामोडींचा आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

8 Sep 2024, 23:46 वाजता

अमित शहांचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा

अमित शहा यांच्या 'मिशन मुंबई'ला सुरूवात झाली आहे. अमित शहांचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अशातच आता दोन दिवसांच्या दौऱ्यात अमित शहांनी बैठकीचा धडाका लावलाय. भाजपची सह्याद्री अतिथी गृहावर बैठक बोलवण्यात आलीये. तर महायुतीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

8 Sep 2024, 20:35 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:लाडकी बहिण योजनेनंतर आता शिवसेनेची 'लाडकी भेट, कुटुंब भेट' मोहीम

लाडकी बहिण योजनेनंतर आता शिवसेनेची 'लाडकी भेट, कुटुंब भेट' मोहीम. शिवसैनिक आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घरा घरात पोहचणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: मोहीमेंतर्गत घरा घरात जाऊन कुटुंबांना भेटी देणार आहेत.

8 Sep 2024, 20:13 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ खाजगी बसला अपघात

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर खाजगी प्रवाशी बसला अपघात झाला. पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती आणि इंदापूर बाह्यवळणापासून पुढे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर या बसचे दोन्ही टायर फुटल्याने लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला या बसने धडक दिली आणि ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास 25 ते 30 फूट खाली जाऊन आदळली. या बस मध्ये नेमकी किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळाली नाही मात्र या बसमधील 10 ते 11 प्रवासी गंभीर जखमी झाले असून या जखमींना इंदापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचार कमी दाखल केल आहे. 

8 Sep 2024, 19:57 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पुढच्या महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागू शकते : अशोक चव्हाण

पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल असा अंदाज व्यक्त करत भाजपला पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलाय.

8 Sep 2024, 19:26 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई विमानतळावर मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांचं स्वागत

मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत केले. अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. 

8 Sep 2024, 18:56 वाजता

अजित पवारच मुख्यमंत्री म्हणून राज्याचे किंगमेकर राहतील - अमोल मिटकरी

अजित पवार किंगमेकर होते, आहेत आणि राहतील. तर आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारच मुख्यमंत्री म्हणून राज्याचे किंगमेकर राहतील असा थेट विश्वास पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.

8 Sep 2024, 18:10 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे भाजपला सोडचिठ्ठी देणार 

वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे भाजपला सोडचिठ्ठी देणार असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचा त्यांनी जाहीर केलं आहे. तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे.  गणपती मंडळाच्या आरतीला गेले असताना त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मागील काही महिन्यांपासून ते भाजप पक्षापासून दूर आहेत. बापू पठारे यांच्या भूमिकेमुळे महायुतीला फटका बसणार आहे. 

8 Sep 2024, 17:16 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह पीटिशनवर 11 सप्टेंबर रोजी सुनावणी

मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या क्युरेटीव्ह पीटिशनवर 11 सप्टेंबर रोजी न्यायमूर्तींच्या बंद दाराआड ही सुनावणी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना दिलेलं मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर ही क्युरेटीव्ह पीटिशन दाखल झाली होती.

8 Sep 2024, 16:54 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: अभिनेता सलमान खानच्या बहिणीच्या घरी बाप्पा विराजमान

अभिनेता सलमान खानच्या बहिणीच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. यावेळी बाप्पाची सुंदर सजावट केली. तसेच बाप्पाला धुप दिप नैवेद्य दाखवून सहपरिवारानं आरती केली. आरतीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालाय.

8 Sep 2024, 16:46 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीचे पंचनामे सुरू

धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीचे पंचनामे सुरू झालेत...सततच्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मुग सोबतच फळबागांचं देखील मोठं नुकसान झालंय...दरम्यान लवकरात लवकर मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीये..