Maharashtra Breaking News LIVE: अमित शाहांचं 'मिशन मुंबई', दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यात बैठकींचा धडाका

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील व देश-विदेशातील ठळक घडामोडींचा आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या 

Maharashtra Breaking News LIVE:  अमित शाहांचं 'मिशन मुंबई', दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यात बैठकींचा धडाका

Maharashtra Breaking News LIVE: देशासह राज्यात मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन झाले आहे. राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतेय. तसंच, राज्यातील राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. जाणून घेऊया राज्यातील ठळक घडामोडींचा आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

8 Sep 2024, 10:34 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत सीबीआयची मोठी कारवाई; जीएसटीच्या अधिक्षकासह दोघांना अटक

सीबीआयने केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधिक्षकासहित दोन खाजगी व्यक्तींना लाचखोरी प्रकरणात अटक केली आहे. सीबीआयने सापळा कारवाई करून केली अटक केली आहे. एका व्यावसायिकला लाचेसाठी तब्बल १८ तास कोंडून ठेवून अटक करण्याची भीती दाखवत ६० लाख मागितल्याचा आरोप आहे.

8 Sep 2024, 10:33 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर भेगा; भूगर्भशास्त्र तज्ञांकडून पाहणी

मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर भेगा पडल्याने खबरदारी म्हणून मागच्या दोन दिवसांपासून सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज त्याठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथील भूगर्भशास्त्र विभाग टिमकडून प्रकल्पाची पाहणी करण्यात आली आहे. निलंगा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर भेगा पडून एक बाजू दबत चालल्याची बाब येथील शेतकऱ्यांनी जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

8 Sep 2024, 10:20 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: महायुतीमध्ये मिठाचा खडा, राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात भाजपने थोपटले दंड

हडपसर मतदारसंघात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. हडपसरमध्ये विकासकामाचे श्रेय लाटताना भाजपला डावलले, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारा विरोधात भाजपने निदर्शने केली आहे. विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्याविरोधात निषेध घोषणा दिल्या आहेत. तसंच, महायुती धर्म फक्त भाजपने पाळायचा का? असा सवाल भाजप आमदार शिवराज घुले यांनी केला आहे. 

8 Sep 2024, 09:31 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर महिलांचे समूहिक अथर्वशीर्ष पठण 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर महिलांचे समूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात येणार आहे. 31 हजार महिलांचा सहभाग ऋषिपंचमी निमित्त आयोजित उपक्रम. ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अरुणा ढेरे यांची उपस्थिती

8 Sep 2024, 09:31 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यातून 40 लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अमली पदार्थ विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढव्यात छापा टाकून ४० लाख रुपयांचे मेफेड्रोन आणि देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. कोंढव्यातून समीर शरीफ शेख याला अटक करण्यात आलीय. 

8 Sep 2024, 09:29 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आज व उद्या ते पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्याचबरोबर, 9 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून नंतर लालाबागचा राजाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.