Maharashtra Breaking News LIVE: माता बालक पोषण आहारात आढळला चक्क मृत वाळा साप

Maharashtra Breaking News LIVE: विरोधकांच्या गदारोळात पंतप्रधान मोदींचं भाषण 

Maharashtra Breaking News LIVE: माता बालक पोषण आहारात आढळला चक्क मृत वाळा साप

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात व देशभरात आता मान्सूनची समाधानकारक वाटचाल सुरू त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर, आता राज्याच्या राजकारणातही विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. तर, एकीकडे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. राज्यातील व देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया लाइव्ह अपडेट्समधून

2 Jul 2024, 11:44 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: शिवीगाळ प्रकरणावरून विधान परिषदेत प्रवीण दरेकर आक्रमक

शिवीगाळ प्रकरणावरून विधान परिषदेत प्रवीण दरेकर आक्रमक झालेयत...सभागृहात बोलल्यानंतर दानवे पुन्हा मीडियात जाऊन बोलतात त्यांना धाक भीती आहे की नाही...कुणाच्यात हिंमत असेल तर बाहेर येऊन बोट तोडावं...आधी कारवाई करा नाहीतर आम्ही सभागृह चालू देणार नाही अशी आक्रमक भूमिका दरेकरांनी घेतली...त्यानंतर कालच्या प्रकाराबाबत माझा निर्णय घेणार असल्याचं उपसभापती गो-हेंनी सांगितलं...

2 Jul 2024, 10:12 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी

राहुल गांधींच्या वक्तव्याचे पडसाद विधानपरिषदेत उमटलेत...प्रसाद लाड यांनी आक्षेप नोंदवत निषेध व्यक्त केला...तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संसदेतील विषय असून आपल्या कामकाजाशी संबंध नसल्याचं यावेळी सभागृहात सांगितलं...त्यावेळी प्रसाद लाड दानवेंकडे हातवारे करून बोलत होते...दानवेंनी माझ्याकडे हातवारे करून बोलायचं नाही, असं म्हणत शिवीगाळ केल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय...एकच गोंधळ उडाल्यानंतर विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलंय...तर आपण कोणालाही घाबरत नसून काय कारवाई करायची ती आपला पक्ष करेल असं दानवे म्हणालेत..

2 Jul 2024, 09:37 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवार, पंकजा मुंडेंसह 5 जणांना भाजपकडून उमेदवारी

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपलाय. लोकसभेतील पराभवानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात आलंय. विधान परिषदेसाठी भाजपने पाच जणांची नावं जाहीर केलीयत. पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिलीय. भाजपचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. 

2 Jul 2024, 08:52 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: विधान परिषदेसाठी निवडणूक अटळ? विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार?

विधानपरिषदेची निवडणूक आता अटळ मानली जातेय. परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असण्याची शक्यताय. महायुती 9 उमेदवार देण्याची शक्यताय. त्यात भाजपनं 5, शिंदे गटानं 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 2 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. आता मविआही तिसरा उमेदवार देण्याची शक्यताय. काँग्रेसनं प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटानं मिलिंद नार्वेकर असे दोन उमेदवार जाहीर केलेत. तर शेकापचे जयंत पाटील मविआचे तिसरे उमेदवार असण्याची शक्यताय. असं झाल्यास विधानपरिषदेची निवडणूक अटळ आहे. 

2 Jul 2024, 08:24 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: शिवसेना ठाकरे गट तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत

महाविकास आघाडीत काँग्रेस कडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर तसे शेकाप चे जयंत पाटील सुद्धा आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शिवसेना ठाकरे गट तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत, मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे. तसंच शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार दिल्यास विधान परिषदेची निवडणूक होणे अटळ आहे. महाविकास आघाडीचे सध्याचे संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यास दहाहून अधिक मतांची गरज लागणार आहे. महायुतीकडून भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे दोन उमेदवार आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

2 Jul 2024, 07:45 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: दुधाचे दर 30 रुपये स्थिर ठेवण्याबाबत चर्चा

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत दूध उत्पादक आंदोलकांची बैठक झाली. त्यात दुधाचे दर 30 रुपये स्थिर ठेवण्याबाबत चर्चा झाली. सरकार 5 रुपये अनुदान देणारेय. तर पावडरसाठी जाणा-या दुधावर 3 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते. 

2 Jul 2024, 06:56 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी

मुंबईतील विधानपरिषद निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचाच डंका पाहायला मिळालाय. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा 44 हजार 784 मतांनी विजय झाला. तर शिक्षक मतदारसंघातूनही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते जगन्नाथ अभ्यंकर यांनी बाजी मारलीय. अभ्यंकर 649 मतांनी विजयी झाले. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळलाय.