छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहताच रोहित शर्माच्या कृतीने जिंकली सर्वांची मनं!

Rohit Sharma At Karjat Jamkhed: आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने उपस्थिती दर्शवली होती.  

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 5, 2024, 05:12 PM IST
छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहताच रोहित शर्माच्या कृतीने जिंकली सर्वांची मनं!  title=
Photo Credit: @CricCrazyJohns

Chatrapati Shivaji Maharaj:  महाराष्ट्रातील कर्जत येथे आमदार रोहित पवार यांनी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर राशीन येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या सोहळ्याला चार चांद लावला तो खास प्रमुख पाहुण्यामुळे. या सोहळ्याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) उपस्थिती दर्शवली. रोहितला बघण्यासाठी तिकडे तरुणांनी तुफान गर्दी केली होती. या कार्यक्रमात रोहित पवारांनी रोहित शर्माला प्रश्नही विचारले. या शिवाय रोहितने कार्यक्रमाला सुरु करण्याआधी जी कृती केली त्याने सगळ्यांचीच मनं जिंकली. 

नक्की काय झालं?

भूमिपूजन करण्यापूर्वी रोहित शर्माने शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक महापुरूषांच्या फोटोला नमन केले. हे नमन केल्या आधी त्याने आवर्जून बूट काढले. रोहितीने केलेली ही कृती पाहून त्याच्या चाहत्यांनी फार कौतुक केले. 

 

हा व्हिडीओ पाहून रोहितने चाहत्यांची मनं जिंकली.हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. 

आज, ३ ऑक्टोबर रोजी आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने कर्णधार रोहित शर्माच्या  हस्ते कुदळ मारून राशीन येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी रोहित पवार यांनी अगदी केबीसी स्टाईलने रोहित शर्माला पाच प्रश्न विचारले. रोहित पवार आणि रोहित शर्मा यांची मजेशीर जुगलबंदी बघायला मिळाली. 

रोहितने टी-२० वर्ल्ड कपचा दुष्काळ संपवला

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने आयसीसी स्पर्धेचा ११ वर्षाचा दुष्काळ संपवला. २००७ नंतर भारतीय संघाने प्रथमच T-२० वर्ल्ड कप जिंकला होता. अलीकडेच नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने बाजी मारली. आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेच्या तयारीला लागण्यापूर्वी रोहितने आज कर्जत-जामखेड मतदारसंघात उपस्थिती लावली.