Maharashtra Breaking News LIVE: मनसेच्या विधानसभा निहाय बैठकांदरम्यान राज ठाकरेंची कट्टा भेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील व देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा आजच्या या लाइव्ह ब्लॉगमधून घेऊयात  

Maharashtra Breaking News LIVE: मनसेच्या विधानसभा निहाय बैठकांदरम्यान राज ठाकरेंची कट्टा भेट

Maharashtra Breaking News LIVE: आज राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. तर, एकीकडे मराठा आरक्षणावरुन राज्यात पुन्हा वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तर, राज्यात विधानसभा निवडणूकांपूर्वीच घडामोडींना वेग आले आहेत. राज्यातील व देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

23 Sep 2024, 16:50 वाजता

पोलिसांनी मराठा आंदोलकांना अडवलं

नांदेडच्या राज कॉर्नर इथे पोलिसांनी मराठा आंदोलकांना अडवलं. यावेळी पोलिसांसोबत मराठा आंदोलकांची बाचाबाची झाली. तर मोर चौक इथे काही आंदोलकांना अडवून पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात 4 ते 5 जण जखमी झाले. दुकान बंद करण्याचं आवाहन मराठा आंदोलक करत असताना, पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप जखमींनी केला. 

23 Sep 2024, 16:04 वाजता

विधानसभा निहाय बैठकांदरम्यान राज ठाकरेंची कट्टा भेट 

मनसेच्या विधानसभा निहाय बैठकांदरम्यान राज ठाकरेंची कट्टा भेट सुरु आहे. सकाळपासून सलग सुरु असणा-या बैठकांमधून थोडा वेळ विश्रांती घेत राज ठाकरेंनी शिवाजी पार्क समोरील कट्ट्यावर काही वेळ घालवला.आतापर्यंत मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक येथी विधानसभांच्या जागांवरील चर्चा पूर्ण झाल्या.

23 Sep 2024, 14:03 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: हजारो गाड्यांचा ताफा घेऊन जलील यांची तिरंगा रॅलीची मुंबईकडे रवाना

विविध मागण्यांसाठी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली काढण्यात आलीय.यामध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सामील झाले असून जलील यांच्या ताफ्यात हजारो गाड्या सामील झाल्याने आणि हा ताफा समृद्धी महामार्गावरून मुंबईकडे निघाल्याने समृद्धी महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याचे बघायला मिळाले.

23 Sep 2024, 13:42 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: 'चौथ्यांदा सरकार येण्याची आमची गँरटी नसली तरी आठवलेंना गॅरेंटी'

चौथ्यांदा सरकार येण्याची आमची गँरटी नाही मात्र रामदास आठवलेना गॅरेंटी आहे. मी गंमतीने म्हणत आहे. सरकार कोणाचे आले तरी रामदास आठवले यांचे मंत्रीपद पक्के असते. असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गंमतीने म्हणालेत.

23 Sep 2024, 12:29 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: राज ठाकरे अमरावती आणि नाशिक दौऱ्यावर जाणार

राज ठाकरे करणार अमरावती आणि नाशिक दौरा करणार आहेत. 26,27 आणि 28 सप्टेंबरला दौरा नियोजित करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर घेणार पदाधिकारी बैठका आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार

23 Sep 2024, 12:28 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: 'मी जरांगे यांच्यासोबत होतो आजही आहे आणि उद्याही राहील'

हे आंदोलन स्वतःसाठी नाही जरांगे यांचा लढा प्रामाणिक असतो मी सरकारला। सांगू इच्छितो शाहू मजाराजांनी मराठ्यांना सुद्धा आरक्षण दिल होत आधीही मी जरांगे यांच्या सोबत होतो आजही आहे आणि उद्याही राहील. जरांगे यांची तब्बेत बरी असती तर अधिक बोललो असतो. जरांगे यांची प्रकृती चिंताजनक आहे. विरोधक आणि सत्ताधारी कुठेय. निवडणूक आली म्हणून तुम्हाला जरांगे आणि बहुजन समाज नको आहे का? असा सवाल संभाजीराजे यांनी केला आहे. 

23 Sep 2024, 12:24 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: जरांगेंना काहीही झाल्यास रस्त्यावर उतरणारः संभाजीराजे

जरांगे यांनी सलाईन घएणे बंद केले आहे. जरांगेंना काहीही झाल्यास रस्त्यावर उतरणार. मी जरांगेंच्या पाठीशी आहे. छत्रपती घरण्यातील व्यक्ती म्हणून त्यांची तब्बेत पाहायला आलेलो.तब्बेत खराब झालेली असताना सरकार एअर कंडिशन मध्ये बसले.विरोधक बघ्याची भूमिका घेत आहे हे चालणार नाही.

23 Sep 2024, 12:05 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: संभाजीराजे आज मनोज जरांगेंच्या भेटीला

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. संभाजीराजे यांनी आज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. जरांगे पाटील हे या वर्षात 6 व्यांदा आमरण उपोषण करत आहे ही राज्यात शरमेची बाब आहे की एक व्यक्ती आरक्षणासाठी जीवाची बाजी लावत आहे आणि त्यावर सरकारने निर्णय घेतला नाही. डॉक्टर कडून मि सगळे रिपोर्ट घेतले. रायगडवर  असताना त्यांची तब्बेत बिघडल्याची माहिती मिळाली

 

23 Sep 2024, 11:26 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  सोलापुरात धनगर समाज आक्रमक, सोलापूर तुळजापूर महामार्गावर केले रास्ता रोको

आरक्षणाच्या मागणीवरून सोलापुरात धनगर समाज आक्रमक झाला आहे. सोलापूर तुळजापूर महामार्गावरील तुळजापूर नाका या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यात हजारो धनगर समाज बांधव रस्त्यावर

23 Sep 2024, 11:06 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: इम्तियाज जलील यांची आज संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली

रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्यावर कारवाई करत तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी इम्तियाज जलील यांची संभाजीनगर ते मुंबई रॅली निघणार आहे. संभाजीनगरमधून मुंबईकडे समृध्दी मार्गाने निघणार असून शिर्डी, नाशिकमार्गे पुढे रॅली मुंबईकडे येणार आहे.