Maharashtra Breaking News LIVE: जरांगेंना काहीही झाल्यास रस्त्यावर उतरणारः संभाजीराजे

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील व देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा आजच्या या लाइव्ह ब्लॉगमधून घेऊयात  

Maharashtra Breaking News LIVE: जरांगेंना काहीही झाल्यास रस्त्यावर उतरणारः संभाजीराजे

Maharashtra Breaking News LIVE: आज राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. तर, एकीकडे मराठा आरक्षणावरुन राज्यात पुन्हा वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तर, राज्यात विधानसभा निवडणूकांपूर्वीच घडामोडींना वेग आले आहेत. राज्यातील व देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

23 Sep 2024, 09:44 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  अजित पवारांनी शरद पवारांना धोका दिलाः संजय राऊत

23 Sep 2024, 09:31 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  भाजपच्या चिंचवड जागेवरून पक्षात अंतर्गत कलह शिगेला

पिंपरी चिंचवड शहरात येणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह चांगलाच वाढला आहे. एकीकडे जगताप कुटुंबीयांना विरोध वाढत असताना माजी स्थायी समिती सदस्य आणि माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनीही विधानसभेसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली. पक्षश्रेष्ठी यावेळी मला डावलणार नाही असा विश्वास ते व्यक्त करत आहे. पण त्याच वेळी उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असा इशारा त्यांनी दिलाय

23 Sep 2024, 08:55 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  अमरावती शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडाक्यासह जोरदार पाऊस

अमरावती जिल्हासह विदर्भात 27 सप्टेंबर पर्यंत विजेच्या कडकडासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावती शहरासह ग्रामीण भागात काल सायंकाळी विजेच्या कडाक्यासह जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे या पावसाने सोयाबीन पावसात भिजले आहे सोयाबीन आता कापणीला येणार आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला जाण्याची शक्यता आहे 

23 Sep 2024, 08:20 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश; उदगीरमध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार

महाराष्ट्राला हादरावुन टाकणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गरोदर महिलांच्या आरोग्याची कसा खेळ सुरू आहे याचा प्रकार लातूर च्या उदगीर मध्ये समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या पथकाला आलेल्या एका निनावी फोन मुळे गर्भपात करत असलेल्या एका मुन्ना भाई डॉक्टराला आणि एका नर्स ला गर्भपात करतानाच पोलीस आणि आरोग्य पथकाला रंगेहाथ पकडून त्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे

23 Sep 2024, 08:07 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  संभाजीराजे छत्रपती 11 वाजता जरांगे यांच्या भेटीसाठी जाणार

नोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा,ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या उपोषणाचा सहावा तर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.हाके आणि ससाणे हे ओबीसी आरक्षण वाचवण्याच्या तर जरांगे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत.जरांगे यांची प्रकृती खालावत चालली असून आज संभाजीराजे छत्रपती जरांगे यांची भेट घेणार असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत.

23 Sep 2024, 08:04 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  'नाना पटोले यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही तर हिसकावून घेऊ'

एकीकडे महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतर घेऊ असे सांगत असले तरी नागपुरात मात्र काँग्रेस नेते चांगलेचं आक्रमक झालेय आहे. नाना पटोले यांनी मेहनत घेतली त्यांना बक्षीस मिळाल पाहिजे. नाही मिळालं तर ते हिसकावून घेऊ असा इशारा देत नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार आक्रमक भूमिका घेतली.

23 Sep 2024, 08:02 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: २०१२ च्या पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुनीब इक्बाल मेमन याला जामीन

२०१२ च्या पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुनीब इक्बाल मेमन याला जामीन देण्यात आला आहे. मुंबईउच्च न्यायालयाने शुक्रवारी जामिनावर सुटका केली असून मुनीब गेली १२ वर्षे तुरुंगात होता
उच्च न्यायालयाने त्याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष न्यायालयाने मेमन याची जामिनावर सुटका करण्यास नकार दिल्यानंतर मेमन याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने त्याला दिलासा दिला