17 सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरू झाला असला तरी पहिले श्राद्ध 18 सप्टेंबरला होते. पितृ पक्ष आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आणि आपल्या पूर्वजांना प्रार्थना करण्यासाठी खूप महत्वाचे मानले जाते. असे मानले जाते की या दिवसांमध्ये पूर्वज आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात. महालय अमावस्या किंवा सर्व पितृ अमावस्येला ते त्यांच्या पूर्वजांच्या जगात परततात. पितृ पक्षाची समाप्ती 2 ऑक्टोबरला होणार आहे.
गर्भवती महिलांना सामान्यतः अनेक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो आणि पितृ पक्षाच्या काळातही धार्मिक रितीरिवाजानुसार गर्भवती महिलेने काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. श्राद्धाच्या दिवसांत गर्भवती महिलेने काय करावे आणि कोणते कार्य टाळावे.
यावेळी पहिल्या श्राद्धाला चंद्रग्रहण आणि शेवटच्या श्राद्धाला सूर्यग्रहण होते. या काळात गरोदर महिलेने पोटावर गेरू लावावे आणि खोलीतून बाहेर पडू नये. यावेळी आपल्या आवडत्या देवाचे नाव घेणे किंवा ध्यान करणे चांगले मानले जाते.
पितृपक्षात गर्भवती महिलेला कोणताही उपवास ठेवायचा नाही. एवढंच नव्हे तर कोणत्याही अंत्ययात्रेला देखील जाऊ नये. किंवा तेथील लोकांच्या गाठीभेटी घेऊ नये. तसेच एकांतात मोकळ्या जागी जाऊ नये. तसेच गर्भवती महिलांनी पितृपक्षात मांसाहार देखील टाळावा.
श्राद्धाच्या दिवसात घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. गरोदरपणात स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असून धार्मिक कार्यात शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. याशिवाय गरोदर महिला श्राद्धाच्या दिवसांत ध्यान आणि प्रार्थना करू शकतात. शांत मन आणि सकारात्मक विचार मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासात मदत करू शकतात.
श्राद्धाच्या दिवसात अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात ज्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. गर्भवती महिलांनी जास्त थकवणारी कामे करणे टाळावे. यामुळे त्यांच्या शरीरावर भार पडू शकतो. गरोदर महिलांनी श्राद्धाच्या वेळी जड तंग कपडे घालू नयेत. तुम्ही फक्त आरामदायी आणि सैल कपडे घालावेत.
श्राद्ध करताना जास्त वेळ उभे राहणे टाळावे. कोणताही धार्मिक विधी होत असेल तर तो पूर्ण केल्यानंतर काही वेळ बसावे पण सतत उभे राहू नये. शक्य तितके आराम करा आणि बसून विधी करण्याचा प्रयत्न करा. श्राद्धाच्या वेळी काही प्रकारचे अन्न वर्ज्य आहे, जसे की तामसिक अन्न (मांसाहार, कांदा, लसूण इ.). गर्भवती महिलांनी या काळात तामसिक आहार टाळावा आणि सात्विक आहार घ्यावा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)