Maharashtra Breaking News LIVE: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील आरोपी चेतन पाटील याला जामीन मंजूर

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली असली तर शनिवारी लागणाऱ्या निवडणुकांच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. याचप्रमाणे दिवसभरातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचे संक्षिप्त अपडेट्स तुम्हाला येथे जाणून घेता येतील...

Maharashtra Breaking News LIVE:  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील आरोपी चेतन पाटील याला जामीन मंजूर

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा. कानाकोपऱ्यातील प्रत्येक बातमी एका क्लिकवर. 

 

21 Nov 2024, 18:32 वाजता

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील आरोपीला जामीन मंजूर

 मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या प्रकरणानंतर मुख्य आरोपी असलेला जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना अटक करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणी चेतन पाटील यास जामीन मंजूर झाला आहे.

21 Nov 2024, 17:42 वाजता

दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार आहे. तर दहावीच्या परीक्षेसाठी 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

21 Nov 2024, 17:12 वाजता

संजय राऊत हायकमांड, ते काहीही बोलू शकतात : नाना पटोले

संजय राऊत हायकमांड, ते काहीही बोलू शकतात असं म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. 

21 Nov 2024, 16:41 वाजता

भाजपच्या अतुल सावेंनी पैसे वाटले, इम्तियाज जलील यांचा आरोप

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या अतुल सावे यांनी संभाजीनगरमध्ये मतं मिळवण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.  

21 Nov 2024, 16:24 वाजता

महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत आम्ही सकारात्मक : राहूल गांधी

 महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत आम्ही सकारात्मक. निवडणुकांमध्ये अदानी हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

21 Nov 2024, 16:01 वाजता

महाविकास आघाडीची आज बैठक, बैठकीत पुढील रणनीती ठरण्याची शक्यता

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर आणि परवा होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने निकालानंतरची रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीत खलबतं होणार. पुढील रणनीती ठरवण्यासाठी निकालाआधी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून चर्चा करणार आहेत. 

21 Nov 2024, 15:54 वाजता

आम्हाला गुवाहटी  पार्ट 2 करण्याची गरज नाही : संजय शिरसाट

आमच्यात भाजप मोठा भाऊ दिसत आहे, पण आम्ही सख्खे भाऊ आहोत. आम्हाला इतरांची गरज पडणार नाही, गरज पडल्यास अपक्ष सोबत घेऊ. आम्हाला गुवाहटी  पार्ट 2 करण्याची गरज नाही, आम्ही नवीन ठिकाणी जाऊ असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

21 Nov 2024, 15:06 वाजता

राज्यात मविआ येणार , पटोलेंचा दावा म्हणजे मुंगेरीलाल के सपने, असं प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे. लग्नाआधीच बाळाचे नाव काय ठेवायचे ? असा पटोलेंचा प्रकार

मुळात मविआ पाडापाडी झाली, त्यांच्यात वाद आहेत, ते काय जिंकणार, असा प्रश्न देखील प्रविण दरेकरांनी विचारला आहे. 

पोल हे काही फायनल नाही. तरीही, युतीचेच सरकार येणार असा दावा देखील प्रविण दरेकरांनी केला आहे.

काही प्रमाणात अपक्ष जिंकतील. काही अपक्ष युतीकडे येतील. दुसरीकडे काही अपक्ष हे युतीचेचे आहेत, त्यामुळे ते पुन्हा युतीत येतील. ते मूळ घरी परत येतील.

21 Nov 2024, 14:12 वाजता

भारतामध्ये 2050 सालापर्यंत लहान मुलांची संख्या 35 कोटी होणार आहे. युनिसेफच्या अहवालानुसार सध्याच्या आकडेवारीच्या तुलनेत भारतातील मुलांची संख्या 10 कोटींनी घटणार आहे. सध्या भारतामध्ये 44 कोटींहून अधिक लहान मुले आहेत

21 Nov 2024, 14:11 वाजता

रेल्वे अपघात रोखण्यात मध्य रेल्वे अपयशी ठरली आहे. रेल्वे अपघाताने गेल्या एका वर्षात 2 हजार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातांचा आकडा वाढत चालला आहे. ट्रेसपासिंग मृत्यूचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.