Maharashtra Breaking News LIVE: सत्ता आली तर मशिदीवरील भोंगे हटवणार : राज ठाकरे

  निवडणूक आणि राज्यातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी...

Maharashtra Breaking News LIVE: सत्ता आली तर मशिदीवरील भोंगे हटवणार : राज ठाकरे

Maharashtra Breaking News Today LIVE Updates:  निवडणूक आणि राज्यातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी...

7 Nov 2024, 20:17 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सत्ता आली तर मशिदीवरील भोंगे हटवणार : राज ठाकरे

आम्ही सत्तेत नसताना लोकांचे प्रश्न सोडवले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे सरकार होते. त्यावेळी जर सरकारने साथ दिली असती तर एकाही मशिदीवर भोंगा दिसला नसता. माझ्या हातात सत्ता दिली तर मशिदीवरील भोंगे हटवणार असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

7 Nov 2024, 19:42 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: मुंबईकर फक्त समस्या सहन करतोय : राज ठाकरे 

संपूर्ण मुंबई शहराचा विचका झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर फक्त समस्या सहन करतोय. मनसेमुळे राज्यातील 65 टोलनाके बंद झाले. यावर मनसेला कुणीही श्रेय दिलं नाही. अनेक विषय सत्तेत नसताना देखील आम्ही पूर्ण केलेत, असं राज ठाकरे यांनी म्हणाले. 

7 Nov 2024, 19:10 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: बंडखोरी करणाऱ्या नेत्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

बंडखोरी करणाऱ्या नेत्यांची काँग्रेसमधून 6 वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे. 

7 Nov 2024, 18:56 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: मनोज जरांगे पाटलांचा राज ठाकरेंना इशारा 

तुम्ही माझ्या लफड्यात पडू नका आणि माझ्या नादी लागू नका असं म्हणत मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना इशारा दिलाय. उपोषणावेळी आरक्षण मिळू शकत नाही असं जरांगे यांची भेट घेऊन राज ठाकरेंनी सांगितलं होतं असं जाहीर भाषणात राज ठाकरेंनी उल्लेख केला होता. त्यावर जरांगे यांनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतलाय. आमचा वर्ग तुम्हाला माणणारा आहे. मात्र तुम्ही आरक्षणावर काही बोलू नये. समाजाचं अस्थित्व आणि आरक्षण कसं मिळवायचं ते मी पाहतो.

7 Nov 2024, 17:42 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार 

राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. उद्धव ठाकरे 13 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. दुपारी 3 वाजता कणकवली, संध्याकाळी 5 वाजता कुडाळ तर संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या सिंधुदुर्गात जाहीर सभा होतील. आता राणेंच्या बालेकल्ल्यात उद्धव काय बोलणार याकडे  सर्वांचं लक्ष लागलंय. 

7 Nov 2024, 17:14 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपनं आक्रमक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. संविधान सिर्फ बहाना है लाल पुस्तक को बढ़ाना है अस व्टिवट महाराष्ट्र भाजपनं केलंय. काँग्रेसला भारताचे संविधान कोरं करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे, अनुच्छेद वगळायचे आहेत. म्हणूनच राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती, असं ट्विट भाजपनं केलंय. 

7 Nov 2024, 16:23 वाजता

अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची केली विचारपूस

काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली होती

आज आंबेडकरांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवारांनी घेतली भेट 

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवारांनी भेट घेतल्याने चर्चांना उधाण

7 Nov 2024, 15:25 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: EVM हॅक करुन जिंकून देण्याचं आमिष देणारा गजाआड

EVM हॅक करुन वसंत गीतेंना जिंकून देणाऱ्या आरोपीला नाशिकमध्ये अटक करण्यात आलीये. भगवानसिंग चव्हाण असं या आरोपीचं नाव आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला चव्हाण यानं EVM हॅक करुन गीतेंना जिंकून देण्याचं आमिष दाखवलं होतं. त्याबदल्यात 42 लाख रुपयांची मागणी केली होती. यातील 5 लाख रुपये तात्काळ द्या उरलेले नंतर द्या असं सांगितले होते. प्रोग्रामिंगवाले ओळखीचे आहेत. त्यामुळे पैसे न दिल्यास गीतेंना पराभूत करण्याचीही धमकी या आरोपीनं दिली.

7 Nov 2024, 14:53 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: शिंदे गटानंतर शिवसेना ठाकरे गटाचा मनसेला धक्का

मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे यांचा थोड्याच वेळात मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. अखिल चित्रे हे वांद्रे पूर्व इथून मनसेकडून माजी आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट दिल्यामुळे नाराज होते.  तृप्ती सावंत यांना बाहेरून शेवटच्या क्षणी  मनसेकडून उमेदवारी दिल्यामुळे नाराजी होती. अखिल चित्रे यांनी २०१९ मध्ये वांद्रे पूर्व इथून मनसेकडून निवडणूक लढवली होती त्यांना जवळपास ११ हजार मत मिळाली होती. मनसेच्या टेलिकॉम सेनेचे अखिल चित्रे हे कार्याध्यक्ष आहे. 

7 Nov 2024, 14:28 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पवारांबाबत वादग्रस्त विधानानंतर सदाभाऊ खोत यांच्याकडून दिलगिरी व्यक्त 

आधी शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान केल्यानतंर आता सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सदा भाऊ खोत यांची सभा उधळवून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. माझ्या विधानामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं खोत म्हणाले.