Shah Rukh Khan Death Threat: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खानला देखील जीवे मारण्याच्या धमक्या लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून मिळत आहेत. अशातच आता शाहरुख खानला देखील धमकीचा फोन आला असून महाराष्ट्र पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी रायपूरला रवाना झाले आहेत.
या प्रकरणी रायपूरच्या एसपीनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाहीये. रिपोर्टनुसार, शाहरुख खानला फैजान नावाच्या व्यक्तीने कॉल केला होता. शाहरुख खानच्या आधी सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून अनेक वेळा धमक्या आल्या आहेत.
शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी
सलमान खाननंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शाहरुख खानला धमकीचा एक कॉल आला होता. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस रायपूरकडे रवाना झाले आहेत. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, जर 50 लाख रुपये नाही दिले तर जीवे मारून टाकू असं म्हटलं आहे.
एफआयआरमध्ये काय?
50 लाख रुपये नाही दिले तर शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे. ही घटना 5 नोव्हेंबरला घडली असून या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, शाहरुख खानला जीवे मारणार. त्यानंतर शाहरुख खानने त्याचे नाव विचारले असता तो म्हणाला की, मला काही फरक पडत नसल्याचे म्हणाला.
सलमान खानच्या सुरक्षेत वाढ
बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. याआधी देखील सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. जीवंत राहायचे असेल तर सलमान खानने आमच्या मंदिरात येथे माफी मागावी किंवा 5 कोटींची खंडणी द्यावी अशी मागणी केली जात आहेत.
BRN
(20 ov) 209/5
|
VS |
TAN
215/4(19.2 ov)
|
Tanzania beat Bahrain by 6 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.