Maharashtra Breaking News LIVE: गीता गवळी ठाकरेंच्या संपर्कात

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घेऊया या लाइव्ह ब्लॉगमधून

Maharashtra Breaking News LIVE: गीता गवळी ठाकरेंच्या संपर्कात

Maharashtra Breaking News LIVE: आजपासून राज्यात नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. राज्यात चैतन्याचे वातावरण आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींनाही वेग आला आहे. 

3 Oct 2024, 12:28 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: ग्रँण्ट रोडवरील युनायटेड चेंबर इमारतीचा स्लॅब कोसळला

ग्रँण्ट रोडवरील युनायटेड चेंबर इमारतीचा स्लॅब कोसळला. दुस-या व चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला असून काहीजण ढिगा-याखाली अडकल्याची शक्यता. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या

3 Oct 2024, 11:52 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  'स्वराज्य पक्षाचे पहिलं आंदोलन हे अरबी समुद्रात शिवस्मारक झाले आहे का हे पाहण्यासाठी'

महाराष्ट्र स्वराज पक्षाची स्थापना तीन दिवसांपूर्वी झाली आहे. स्वराज्य संघटना म्हणून आम्ही यापूर्वी पुढे जात होतो, पण आता मात्र स्वराज्य पक्ष म्हणून आम्ही पुढे जात आहोत. स्वराज्य पक्षाचे पहिलं आंदोलन हे अरबी समुद्रात शिवस्मारक झाले आहे का हे पाहण्यासाठी आहे. 11 तारखेला महाराष्ट्र स्वराज्य पक्ष स्वराज्य पक्षाचे लॉन्चिंग पुण्यात करणार आहे , त्यानंतर नाशिक नांदेड आणि महाराष्ट्र दौरा असणार आहे.

3 Oct 2024, 11:27 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: दसरा मेळाव्याचे राजकीय अर्थ काढू नकाः जरांगे पाटील

राज्यातील मराठयांची इच्छा होती दसरा मेळावा झाला पाहिजे. दसरा मेळाव्याला येणाऱ्यासाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे, जेणेकरुन दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल. अजूनही तब्येत बरी नाही, परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटल मधून सुट्टी घेत आहे. दसरा मेळावा आहे पण त्याचे राजकीय अर्थ काढू नका. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दसरा मेळाव्याला या, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

3 Oct 2024, 11:26 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: नाशिक शहरातील सिडकोची घरे फ्रीहोल्ड करण्याचा शासनाचा निर्णय 

नाशिक शहरात तील सिडकोची घर फ्री होल्ड करावी अशी मागणी गेल्या दोन दशकांपासून होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिककरांची मागणी लक्षात घेऊन ही सर्व घरे फ्री होल्ड केल्याने आता सिडको धारक आत्यानंदीत झाले आहेत. त्यांना स्वतःच्या घराची जागा स्वतःच्या मालकीच्या नावावर मिळणार आहे. या निर्णयामुळे नाशिक शहरात गुलाल उधळून तसेच फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला

3 Oct 2024, 11:07 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात शक्ती अभियान सुरू करणार; अजित पवारांची घोषणा

बारामतीत जशा घटना घडतायत अशा घटना घडायला नको, याची काळजी घेण्यासाठी काही पावलं तातडीने उचलण्याची गरज आहे. आज सकाळी बारामतीमधल्या सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी माझी बैठक झाली. शक्ती अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. मुलींना आपली तक्रार मांडण्याकरता एसटी स्टँड कोचिंग क्लासेस शाळा हायस्कूल महाविद्यालय या ठिकाणी शक्ती बॉक्स तक्रारपेटी लावली जाणार

3 Oct 2024, 10:30 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  सोलापूर जिल्ह्यात ज्योत घेऊन जाणाऱ्या देवी भक्तांवर काळाचा घाला

तुळजापूरहुन मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीकडे जाताना कामती येथे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात चारचाकी पिकअप पलटी झाला. या अपघातात प्रदीप क्षीरसागर आणि नेताजी कराळे हे दोघे जागीच ठार झाले आहेत. तर बाकीचे सहा जण आहेत गंभीर जखमी झाले आहेत. 

3 Oct 2024, 10:29 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  मविआतील लहान घटक पक्षांची ३० हून अधिक जागांची मागणी; सूत्रांची माहिती

काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना हे तीन पक्ष सुमारे २८२ जागा आपल्याकडे ठेवतील, तर ऊर्वरीत पाच ते सहा जागा छोट्या घटक पक्षांना सोडण्याची शक्यता. मविआतील लहान घटक पक्षांची ३० हून अधिक जागांची मागणी असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

3 Oct 2024, 09:24 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: नागपूर शहर बससेवा ठप्प

नागपूर शहर बससेवा ठप्प शहर बससेवेतील आपली बसचे कर्मचारी संपवार गेले आहेत. पगार वाढीच्या मागणीकरता आपली बस कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. मोरभवन बसस्टॅण्ड येथे आंदोलन सुरु आहे. 

3 Oct 2024, 08:53 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: शिर्डी - कारची दुचाकीला जोराची धडक, एकाचा मृत्यू

शिर्डी विमानतळ रस्त्यावर कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झालाय.. राहुल भाऊसाहेब विखे वय वर्षे 35, असे मयत युवकाचे नाव असून तो ड्युटीसाठी कोऱ्हाळे येथून शिर्डीकडे निघाला होता

3 Oct 2024, 08:44 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: अंबाबाई मंदिरात घटस्थापना केल्यानंतर नवरात्र उत्सवाला होणार सुरुवात

साडेतीन शक्तीपीठापैकी महत्त्वाचं पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी झाली आहे.. सकाळी साडेआठ वाजता मंदिर परिसरात तोफेची सलामी दिल्यानंतर मंदिरात घटस्थापना केली जाणार आहे.