Maharashtra Breaking News LIVE: गीता गवळी ठाकरेंच्या संपर्कात

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घेऊया या लाइव्ह ब्लॉगमधून

Maharashtra Breaking News LIVE: गीता गवळी ठाकरेंच्या संपर्कात

Maharashtra Breaking News LIVE: आजपासून राज्यात नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. राज्यात चैतन्याचे वातावरण आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींनाही वेग आला आहे. 

3 Oct 2024, 08:43 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: रेणुका मातेच्या माहुर गडावर आज दुपारी होणार घट स्थापना

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या नांदेड जिल्हयातील माहूर गडावरील रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाला आज पासुन सुरूवात झाली. नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी माहूर गडावर करतायत आली आहे. आज दुपारी साडे बारा वाजता गडावर विधिवत घट स्थापना केली जाणार आहे. घट स्थापने नंतर मुख्य पूजा होईल

3 Oct 2024, 08:42 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: कापूस आणि तुरीच्या शेतात गांजाची शेती, पोलिसांनी झाडे केली जप्त

आदिवासी वन परिक्षेत्र असलेल्या ठिकाणी लावण्यात आलेली गांजाची झाडे पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. नांदेड जिल्हयातील किनवट तालुक्यातील दिग्रस आणि डोंगरगाव शिवारात गांजाची झाडे पोलीसांनी पकडली. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शिवारात गांजाची शेती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

3 Oct 2024, 08:42 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: राज ठाकरे शनिवारी-रविवारी नाशिक दौऱ्यावर

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता मनसेने देखील टॉप गिअर टाकला असून संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून तसेच संभाव्य इच्छुकांची चाचणी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रदीर्घ कालावधीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या शनिवार व रविवारी ५ व ६ ऑक्टोबर दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

3 Oct 2024, 07:42 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: देवी तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान, पहाटे दोन वाजता पारंपारीक विधी करुन देवीची प्रतिष्ठापना 

9 दिवसाच्या घोर निद्रेनंतर श्री तुळजाभवानी माता आज पहाटे दोन वाजता पलंगावरून सिंहासनावर विराजमान झाली. सकाळी आभिषेक पुजा करुन दुपारी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विधीवत घटस्थापनेने शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे. महत्वाचे म्हणजे तुळजाभवानीची मुर्ती ही चल मूर्ती असल्याने इकडून तिकडे हलवण्यात येते.

3 Oct 2024, 07:40 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: अखेर भाऊसाहेब भोईर यांनी सोडली अजित पवारांची साथ

अजितदादांचे खंदे सर्मथक असलेले पिंपरी चिंचवडमधील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळं राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यालाच भगदाड पाडलंय.मागील तीन दशकांपासून भाऊसाहेब भोइर हे पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील स्थानिक मोठे नेते राहिले आहेत 

3 Oct 2024, 07:35 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दुपारी १ वाजता सेना भवनात पत्रकार परिषद

3 Oct 2024, 07:34 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: कार्ला गडावरील एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात

महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीचा शारदीय नवरात्र उत्सवाला आज पासून सुरुवात झाली. आजपासून म्हणजेच घटस्थापनेच्या दिवसापासून महानवमी होमापर्यत सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार विधिवत होणार असून आज सकाळी 8 वाजता कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे.

3 Oct 2024, 06:45 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन

धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे दुःखद निधन झालं आहे. फुफुसला इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल रात्री साडेदहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी 11 वाजता परंडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.