Maharashtra Breaking News LIVE: मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घेऊया या लाइव्ह ब्लॉगमधून

Maharashtra Breaking News LIVE: मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा

Maharashtra Breaking News LIVE: आजपासून राज्यात नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. राज्यात चैतन्याचे वातावरण आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींनाही वेग आला आहे. 

3 Oct 2024, 20:33 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची मोठी घोषणा. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये मराठीसह पाली, आसामी, प्राकृत आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. 

3 Oct 2024, 18:51 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा इंदापुरात जल्लोष

हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा इंदापुरात जल्लोष. पाटलांच्या बंगल्यासमोर फटाके फोडत भरवले एकमेकांना पेढे. राम कृष्ण हरी वाजवा तुतारी, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार घोषणांचा दिला नारा.

3 Oct 2024, 18:27 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते माझ्या संपर्कात : चरण वाघमारे

सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. तुमसर विधानसभेवर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी पक्षाने दावा केलेला आहे. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये माजी आमदार चरण वाघमारे यांची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे. पण आधी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये असलेल्या कार्यकर्त्यांनी चरण वाघमारे यांचा विरोध दर्शविलेला आहे. पण वरिष्ठ नेते संपर्कात असल्याचं चरण वाघमारे यांनी सांगितले आहे. जर मला कुठल्याही पक्षाची तिकीट दिली तर मी नक्कीच लढण्यासाठी इच्छुक आहे. नाही दिली तरी माझी अपक्ष लढण्याची तयारी असल्याची माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिली आहे. 

3 Oct 2024, 17:55 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचे प्रमाण वाढले आहे : चंद्रकांत पाटील

अलीकडच्या काळामध्ये एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीमध्ये उड्या मारण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतं की भाजप पक्षात तिकीट मिळणार नाही ते दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहेत. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

3 Oct 2024, 17:23 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: सांगली, मिरजमध्ये मुसळधार पाऊस

सांगली आणि मिरज शहरासह परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला आहे. दुपारनंतर अचानक पडलेल्या या पावसामुळे सर्वसामान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. 

3 Oct 2024, 16:40 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE: गीता गवळी ठाकरेंच्या संपर्कात 

अरुण गवळींची मुलगी गीता गवळी ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. गीता गवळी यांनी आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली आहे. 

3 Oct 2024, 16:34 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: आई भवानी..सावत्र भावांना सुद्धबुद्धी दे - एकनाथ शिंदे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज  बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे यांचा हा दुसरा बुलडाणा जिल्हा दौरा होता. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, नवरात्र उत्सवात आई भवानी सावत्र भावांना सूदबुद्धी दे, लाडकी बहीण योजनेत कोणताही खोडा आणू नये, तसे विघ्न आणले तरी कुठलेही फरक पडणार नाही. ही योजना चालूच राहणार असे ते म्हणाले. 

3 Oct 2024, 15:49 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: हैदराबाद गॅझेटमध्ये स्वतंत्र कुणबी नोंदी सापडत नसल्याचा चंद्रकांत पाटील यांचा दावा

हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबीच्या स्वतंत्र नोंदी सापडत नाहीत परंतु मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा कुणबी नोंदी वाढल्या असं सांगत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हैदराबाद गॅझेटच्या कुणबी नोंदीबाबत अप्रत्यक्ष प्रश्न उपस्थित केला आहे. 

3 Oct 2024, 15:00 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी? 

पश्चिम महाराष्ट्रात भाजपला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

3 Oct 2024, 14:50 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: जागा वाटपाचा तिढा दसऱ्यापूर्वी सुटेल : चंद्रकांत पाटील

महायुतीमध्ये जागा वाटपाचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत .फडणवीस हे मुख्यमंत्री व अजित पवार यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा करत आहेत . 10 ते 12 जागा वगळता एकमत झाले आहे. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाचा प्रश्न लवकरच म्हणजे दसऱ्यापूर्वीच सुटेल असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.