Maharashtra Breaking News LIVE: पालघरमध्ये दिसली संशयित बोट; सतर्कतेचा इशारा

Maharashtra Breaking News LIVE: राज्याबरोबरच देशभरातील प्रमुख घडामोडींचे सर्व अपडेट्स अगदी संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या; दिवसभरातील ताज्या घडामोडींनी धावा आढावा...

Maharashtra Breaking News LIVE: पालघरमध्ये दिसली संशयित बोट; सतर्कतेचा इशारा

4 Oct 2024, 11:21 वाजता

आजच्या कॅबिनेटमधील चर्चेचे विषय

आजच्या कॅबिनेटच्या अजेंड्यामध्ये मागील बैठकीच्या इतीवृत्तांताला मान्यता देण्याबरोबरच राज्यातील पाऊस आणि पीक पाण्याच्या विषयावर चर्चा होईल असं सांगितलं जात आरहे. तसेच 'लडकी बहीण योजने'चा विभागवार आढावाही घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि कोकणात कायमस्वरूपी नवी एसडीआरएफची टीम कायमस्वरूपी तैनात करण्याबाबत चर्चा होणं अपेक्षित आहे. धरणांवरील जलविद्युत प्रकल्प बीओटी तत्त्वावर देण्याबाबत चर्चा होईल असं सांगितलं जात आहे.

4 Oct 2024, 10:36 वाजता

हर्षवर्धन पाटलांनी बोलावली समर्थकांची बैठक

हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रांगणात ही बैठक होणार आहे.  या बैठकीत हर्षवर्धन पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत. हर्षवर्धन पाटील भाजपची साथ सोडून शरद पवारांची तुतारी हाती घेणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.

4 Oct 2024, 10:35 वाजता

शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर

शरद पवार आणि नितीन गडकरी आज एकाच व्यासपीठावरराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे आज दिवसभर सांगली दौऱ्यावर आहेत. विविध कार्यक्रम आणि उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते पार पडणार आहेत. दुसरीकडे भाजपानेते व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार हे दोघे सांगलीतील मराठा समाज संस्थेच्या कार्यक्रमा निमित्ताने एकाच व्यासपीठावर असणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा नेते एका मागून एक शरद पवारांच्या पक्षात दाखल होत असून काल सांगलीत शरद पवारांनी दाखल होताचं भाजपाला धक्का देत भाजपाचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना आपल्या पक्षात दाखल करून घेतले आहे .त्यामुळे भाजपाला खिंडार पाडत असताना भाजपा नेते नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर असल्याने सगळ्यांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागून राहिले आहे.

4 Oct 2024, 09:53 वाजता

मद्यपान करुन बाईकला धडक देत दोघांचा जीव घेतला; गुन्हा दाखल

सोलापूर महामार्गावरील बुधोडा ते पेठ या महामार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील दोघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कार चालक दारू पिऊन गाडी चालतवत होता. त्या गाडीत एकूण 5 जण होते. रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना कट मारणे, शिवीगाळ करणे, आरडाओरडा करुन कार वेडीवाकडी चालविणे असे प्रकार सुरु होते. त्यानंतर या दुचाकीलाही त्या कारने कट मारली. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या सादिक शेख यांनी विचारपूस केली असता कारमधील चार-पाच जणांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर दुचाकीस्वार दोन चिमुकल्यासह पती-पत्नी घेऊन त्या ठिकाणाहून लातूरकडे निघाला. दुचाकी पुढे गेल्यानंतर पाठीमागून या कारने पाठलाग करून दुचाकीवरून जाणाऱ्या या कुटुंबाला जोरदार धडक. यामध्ये इकरा सादीक शेख, नादिया शेख हे जागीच ठार झाले. तर सादीक आणि मुलगा आहाद हा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाशी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून औसा पालीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

4 Oct 2024, 09:48 वाजता

...तर मराठीला मेहरबानीची गरज नाही : संजय राऊत

"लोकसभेत आम्हाला हरवलं म्हणून तुम्हाला हा मराठी भाषेच्या अभिजात दर्जा देत असेल असा जर कोणाला वाटत असेल ही मेहरबानी तर या मेहरबानीची मराठी भाषेला गरज नाही. ही शूराची भाषा आहे. मर्दांची भाषा आहे. शयराची भाषा आहे. ही संतांची भाषा आहे आणि महाराष्ट्रात ही सगळी परंपरा शौर्यांची आणि संतांची फार महान आहे," असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

4 Oct 2024, 09:45 वाजता

मी जिवंत राहिलो तर...; अशोक चव्हाणांचे कार्यकर्त्यांसमोर वक्तव्य

"मी उद्या राजकीय क्षेत्रात राहिलो नाही तर तुम्ही बोलणार कोणावर, मी जिवंत राहिलो तर तुम्हीपण जिवंत रहाल, मीच जर संपलो तर तुम्हीपण संपाल", असं वक्तव्य माजी खासदार अशोक चव्हाण यांनी केलं. भोकर मतदार संघातील शेलगाव येथील एका कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. भोकर मधून यावेळी त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण विधानसभा लढणार आहेत. श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण मतदार संघ पिंजून काढत आहेत. सातत्याने टीका होत असल्याने त्यांनी विरोधकाना उद्देशून भाष्य केले.

4 Oct 2024, 09:43 वाजता

राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे काँग्रेसला अधिक बळ मिळेल : सतेज पाटील

राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे काँग्रेसला नक्कीच अधिक बळ मिळेल असं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्र हा भाजपचा गड राहिला नसून त्याची नट बोल्ट निखळत निघालेत अशी टीका देखील सतेज पाटील यांनी केलीय.

4 Oct 2024, 08:43 वाजता

अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांना सूचक संकेत

उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होते. कार्यकर्त्यांचा बूथ कमिटीच्या बैठका त्यांनी घेतल्या यावेळी त्यांनी मी जो उमेदवार देईल त्याला आपण निवडून द्यावे असे म्हणत विधानसभेच्या निवडणुकीतून अजित पवार आता माघार घेणार आहेत की काय असे संकेतच त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. 

4 Oct 2024, 08:41 वाजता

मराठीसंदर्भातील निर्णय फक्त जुमला ठरू नये : नाना पटोले

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात घेतलेला निर्णय फक्त जुमला ठरू नये अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

4 Oct 2024, 08:39 वाजता

पालघरमध्ये दिसली संशयित बोट; पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

पालघरच्या घोलवड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास संशयित बोट दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. घोलवडजवळील चिखले वडकतीपाडा येथील समुद्रात संशयित बोट मध्यरात्रीच्या सुमारास दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या काही तरुणांना बघून ही बोट पुन्हा माघारी फिरल्याची पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली आहे. त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवरील सर्व पोलीस ठाण्यांसह नागरिकांना पालघर जिल्हा पोलीस प्रशासनाच सतर्कतेच आवाहन केले आहे. पोलिसांनी परिसरात संशयित हालचाली दिसून आल्यास त्वरित पोलिसांना खबर देण्याच आवाहनही केलय. जिल्ह्यातील मासेमारी बोटींपेक्षा वेगळी बोट असल्याची तरुणांची पोलिसांना माहिती दिली आहे.