Maharashtra Breaking News LIVE: पुणे बलात्कार प्रकरण : गृहमंत्री फडणवीसांचा पोलीस आयुक्तांना फोन; दिले 'हे' आदेश

Maharashtra Breaking News LIVE: राज्याबरोबरच देशभरातील प्रमुख घडामोडींचे सर्व अपडेट्स अगदी संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या; दिवसभरातील ताज्या घडामोडींनी धावा आढावा...

Maharashtra Breaking News LIVE: पुणे बलात्कार प्रकरण : गृहमंत्री फडणवीसांचा पोलीस आयुक्तांना फोन; दिले 'हे' आदेश

4 Oct 2024, 09:45 वाजता

मी जिवंत राहिलो तर...; अशोक चव्हाणांचे कार्यकर्त्यांसमोर वक्तव्य

"मी उद्या राजकीय क्षेत्रात राहिलो नाही तर तुम्ही बोलणार कोणावर, मी जिवंत राहिलो तर तुम्हीपण जिवंत रहाल, मीच जर संपलो तर तुम्हीपण संपाल", असं वक्तव्य माजी खासदार अशोक चव्हाण यांनी केलं. भोकर मतदार संघातील शेलगाव येथील एका कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. भोकर मधून यावेळी त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण विधानसभा लढणार आहेत. श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण मतदार संघ पिंजून काढत आहेत. सातत्याने टीका होत असल्याने त्यांनी विरोधकाना उद्देशून भाष्य केले.

4 Oct 2024, 09:43 वाजता

राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे काँग्रेसला अधिक बळ मिळेल : सतेज पाटील

राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे काँग्रेसला नक्कीच अधिक बळ मिळेल असं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्र हा भाजपचा गड राहिला नसून त्याची नट बोल्ट निखळत निघालेत अशी टीका देखील सतेज पाटील यांनी केलीय.

4 Oct 2024, 08:43 वाजता

अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांना सूचक संकेत

उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होते. कार्यकर्त्यांचा बूथ कमिटीच्या बैठका त्यांनी घेतल्या यावेळी त्यांनी मी जो उमेदवार देईल त्याला आपण निवडून द्यावे असे म्हणत विधानसभेच्या निवडणुकीतून अजित पवार आता माघार घेणार आहेत की काय असे संकेतच त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. 

4 Oct 2024, 08:41 वाजता

मराठीसंदर्भातील निर्णय फक्त जुमला ठरू नये : नाना पटोले

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात घेतलेला निर्णय फक्त जुमला ठरू नये अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

4 Oct 2024, 08:39 वाजता

पालघरमध्ये दिसली संशयित बोट; पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

पालघरच्या घोलवड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास संशयित बोट दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. घोलवडजवळील चिखले वडकतीपाडा येथील समुद्रात संशयित बोट मध्यरात्रीच्या सुमारास दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या काही तरुणांना बघून ही बोट पुन्हा माघारी फिरल्याची पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली आहे. त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवरील सर्व पोलीस ठाण्यांसह नागरिकांना पालघर जिल्हा पोलीस प्रशासनाच सतर्कतेच आवाहन केले आहे. पोलिसांनी परिसरात संशयित हालचाली दिसून आल्यास त्वरित पोलिसांना खबर देण्याच आवाहनही केलय. जिल्ह्यातील मासेमारी बोटींपेक्षा वेगळी बोट असल्याची तरुणांची पोलिसांना माहिती दिली आहे.

4 Oct 2024, 08:33 वाजता

राज्यातील 29 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार

राज्यातील 29 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. लांबणीवर पडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. राज्यातील जवळपास 29 हजार 443 सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार अ वर्गातील 42, ब वर्गातील 1716 , क वर्गातील 12250, आणि ड वर्गातील 15435 अशा संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पुणे जिल्ह्यात आणि शहरात मिळून 3038 सहकारी संस्था आहेत. 

4 Oct 2024, 08:24 वाजता

मराठी भाषेला अभिजात दर्जा : CM शिंदेंनी मानले मोदी-शाहांचे आभार

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळ्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!! अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार," असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय. 

4 Oct 2024, 08:21 वाजता

त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना डिस्चार्ज

अक्षय शिंदे चकमक प्रकरणात उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल झालेले पोलीस अभिजित मोरे आणि संजय शिंदे या दोघांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारात जखमी झालेले पोलीस अधिकारी निलेश मोरे अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. लवकरच त्यांना देखील डिस्चार्ज दिला जाणार आहे. 

4 Oct 2024, 08:17 वाजता

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा: मोदींनी व्यक्त केला आनंद

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. "मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल," असं मोदी म्हणाले. 

 

4 Oct 2024, 08:15 वाजता

अपल्पवयीन गुन्हेगारीसंदर्भातील वयोमर्यादा 18 वरुन 14 करण्याचा विचार

राज्यात बाल गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा 18 वर्षांऐवजी 14 वर्षे करण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. वयोमर्यादा 18 वर्षांऐवजी 14 वर्षे करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारशी निगडित आहे त्यामुळे अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते.