Maharashtra Breaking News Today LIVE Updates: समाजकारण ते राजकारण... दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर जाणून घ्या...
9 Jan 2025, 19:52 वाजता
मंत्रालयात आलेली लँबॉर्गिनी कार कोणाची?
बुधवारी मंत्रालयात अलिशान लँबॉर्गिनी कार आल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या. ही कार स्काय लाईन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती आहे. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी या कारमधून कोणी तरी आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर तासंतास वाट बघावी लागते मात्र या अलिशान कारला काल चेक न करताच मंत्रालयात थेट सोडण्यात आलं. विशेष म्हणजे या कारच्या काचा या काळ्या रंगाच्या होत्या. त्यामुळे कारमध्ये कोण होत याची माहिती मिळू शकली नाही. मात्र ही अलिशान कार मंत्र्यांचा ताफा ज्या ठिकाणी उभा राहतो त्या ठिकाणी थांबल्याने सर्वांच्या नजरा या अलिशान कारकडे होत्या.
9 Jan 2025, 19:14 वाजता
आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार : शरद पवार
आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देण्यात येणार उर्वरित 50 टक्के जागांपैकी 60 ते 70 जागा ह्या तरुणांना देण्यात येणार आहेत. पुढील 8 दिवसांमध्ये बैठक घेऊन यावर चर्चा करण्यात येणार असं आश्वासन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलं आहे.
9 Jan 2025, 19:09 वाजता
लातूरच्या जमिनीवर बीडमधून पीकविमा, झी २४ तासच्या बातमीनंतर कृषी विभागाला जाग
लातूर जिल्ह्यातील रेणापूर, हणमंतवाडी आणि काळेगाव इथे जवळपास 1 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या गटावर दुसऱ्याच व्यक्तींनी पीकविमा भरल्याचा धक्कादायक प्रकार ZEE 24 TAAS ने समोर आणला होता. या बातमीनंतर जिल्हा कृषी विभागाने पिकविमा कंपनीला आदेश दिलेत. सात बारा एकाचा आणि बँक खाते दुसऱ्याचेच असल्याने विम्याची प्रक्रिया रद्द करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलीय. आत्तापर्यंत कृषी विभागाच्या चौकशीत 260 शेतकऱ्यांच्या नावावर परळी आणि गंगाखेड अशा बाहेरील जिल्ह्यातील लोकांनी बोगस पीकविमा भरल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळतेय. उर्वरित बोगस पीकविमा काढलेल्या लोकांचा कृषी विभागाकडून शोध घेतला जातोय.
9 Jan 2025, 18:39 वाजता
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरु करावी, ठाकरे गटाची मागणी
शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आमदार सुनील शिंदे व आमदार महेश सावंत यांच्या सोबत रेल्वे कामगार सेनेचे सदस्य मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक धर्मवीर मिना यांच्या भेटीसाठी सीएसएमटी येथील कार्यालयात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी दादर ते रत्नागिरी दरम्यान धावणारी पॅसेंजर बंद केली असून ती पुन्हा सुरू करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.
9 Jan 2025, 16:15 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत द्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश
दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत द्या, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. महाराष्ट्र सदनाच्या संदर्भातील शासन आदेश जारी करा, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रशासनाला दिलाय. साहित्यप्रेमींच्या निवासाकरिता जुने महाराष्ट्र सदन मिळावे असे विनंती पत्र आयोजनकांनी राज्य शासनाला चार महिन्यांआधी केलं होतं. 21,22 आणि 23 फेब्रुवारी रोजी दिल्लीत साहित्य संमेलन होत आहे. मात्र, सशुल्क असावे की नि:शुल्क यांत लालफितीत चार महिन्यांपासून हा निर्णय प्रलंबित होता. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत.
9 Jan 2025, 14:59 वाजता
पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी, चोरांनी पळवलं देवीच्या अंगावरील 18 तोळे सोनं
सांगलीच्या मिरजमध्ये पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यानं देवीच्या अंगावरील 18 तोळे सोनं पळवल आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.
9 Jan 2025, 14:50 वाजता
राष्ट्रवादी SPमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा
आताची मोठी बातमी, जयंत पाटलांसमोरच पदाधिकाऱ्याची प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी करण्यात आलीय. कार्यकर्त्यांना वेळ देणारा अध्यक्ष असावा; अशी पदाधिका-याची भूमिका आहे. मराठा सोडून इतर समाजाच्या नेत्याला संधी देण्याची मागणी करण्यात आलीय. मुंबईतील राष्ट्रवादी SPच्या बैठकीत अध्यक्ष बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. मुंबईत शरद पवारांच्या उपस्थित सुरू असलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केलीय.
9 Jan 2025, 14:50 वाजता
राष्ट्रवादी SPमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा
आताची मोठी बातमी, जयंत पाटलांसमोरच पदाधिकाऱ्याची प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी करण्यात आलीय. कार्यकर्त्यांना वेळ देणारा अध्यक्ष असावा; अशी पदाधिका-याची भूमिका आहे. मराठा सोडून इतर समाजाच्या नेत्याला संधी देण्याची मागणी करण्यात आलीय. मुंबईतील राष्ट्रवादी SPच्या बैठकीत अध्यक्ष बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. मुंबईत शरद पवारांच्या उपस्थित सुरू असलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केलीय.
9 Jan 2025, 14:43 वाजता
आकाकडे कमिशन पोहोचलं पाहिजे अशी यंत्रणा; सुरेश धस यांची आरोप
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून पैठणीत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधताना आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. म्हणाले की, मी सोमनाथकडे परभणीला जाऊन आलो त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. परळी इराणी समाजाचे काही लोक आहेत ते गांजा चरस विकतात यांच्या जीवावर, त्यांच्याकडून हिस्सा मिळवायला आका ने पोलीस ठेवले होते आणि त्यांच्या आकाला ही जायचे, थर्मलमध्ये भंगारमध्ये यांचं वाटा होता, आका आणि आकाच्या आकाला सगळ्यांना हिस्सा मिळतो. करुणा असो की डॉ. देशमुख असो त्यांचं चारित्र्य हणन यांनी केले.
9 Jan 2025, 13:57 वाजता
वाल्मीक कराड यांना PMLA आणि ED ची कलमे का लावली नाही? - सुप्रिया सुळे
" जी घटना बीड आणि परभणीत झाली या विरोधात हे नेते पोटतिडकीने बोलत आहे. सर्वात आधी सभागृहात संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात हा मुद्दा मांडला संसदेत जर कोणी सर्वात आधी बोलले असेल तर बजरंग सोनवणे बोलले. बजरंग अप्पा हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी देशमुख यांच्या मारेकरीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. माणुसकीच्या नात्याने सगळं राजकारण सोडून नेते एकत्र आले. PMLA चा ॲक्ट काळा पैसा पकडण्यासाठी आला. कराड यांच्यावर PMLA चे अनेक केसेस झक्या आहेत. वाल्मीक कराड यांना PMLA आणि ED ची कलमे का लावली नाही? त्यांना ED ची नोटीस असताना, आणि खंडणीची नोटीस असताना मग त्यांच्यावर कारवाई का नाही? वाल्मीक कराड यांना स्पेशल ट्रीटमेंट का दिली जातेय? लाडकी बहिण योजना या योजनेचे परळीचे अध्यक्ष आजही वाल्मीक कराड आहेत. ज्या व्यक्तीवर खंडणीचा गुन्हा आहे त्याला तुम्ही या योजनेचा अध्यक्ष करता? एक काळ असा होता की रेल्वे अपघात झाला की नैतिकतेच्या आधारावर मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या या दोन्ही कुटुंबीयांना न्याय द्या. एवढं मोठं यश तुम्हाला मिळाले आहे. या कुटुंबीयांना न्याय द्या."