Maharashtra Breaking News Today LIVE Updates: समाजकारण ते राजकारण... दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर जाणून घ्या...
9 Jan 2025, 07:41 वाजता
दिल्ली विधानसभेसाठी 'आप'ला मित्रांचा पाठिंबा; अखिलेश यादव, ममता बॅनर्जींचा सपोर्ट
दिल्ली विधानसभेसाठी इंडिया आघाडीत काँग्रेस एकाकी पडल्याचं चित्र आहे. कारण दिल्ली विधानसभेसाठी आपला ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांनी पाठिंबा दिलाय.. त्यामुळे काँग्रेसला दिल्ली विधानसभेसाठी मित्र पक्षाची साथ मिळणार नाही. दिल्ली विधानसभा निवडणूक आप आणि काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मित्र पक्षानं आपला पाठिंबा दिल आहे. त्यातच इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती असं अखिलेश यादव यांनी म्हटल्यानं चर्चांना उधाण आल आहे.
9 Jan 2025, 07:37 वाजता
तिरुपती मंदिरात टोकन काढताना चेंगराचेंगरी
Tirupati Temple Stampede: आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील विष्णू निवासमजवळ दर्शन तिकीट विक्रीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमीही झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिरुपती चेंगराचेंगरी: "आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. एका मृतदेहाची ओळख पटली आहे," असे तिरुमाला तिरुपती देवस्थानमचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी माहिती दिली.
Tirupati Stampede: तिरुपती मंदिरात टोकन काढताना चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू; अनेकजण जखमी < येथे वाचा सविस्तर
- ‹ previous
- 1
- 2
- 3
- 4