Maharashtra Breaking News Today LIVE Updates: समाजकारण ते राजकारण... दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर जाणून घ्या...
9 Jan 2025, 10:58 वाजता
राष्ट्रवादी SP पक्षाची आजही बैठक, आढावा बैठकीचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आजही आढावा बैठक होणार आहे. आजही शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. आढावा बैठकीला बुधवारपासून सुरुवात झाली. काल युवक, महिला पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांची बैठक शरद पवार यांच्या नेतृत्वात पार पडली. या बैठकीत लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आणि पक्षासमोरच्या आव्हांनाबाबत पवारांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. आगामी काळात पक्षात संघटनात्मक बदल होतील, असे संकेतही पवारांनी दिलेत.
9 Jan 2025, 10:42 वाजता
एकनाथ शिंदेंची इच्छा नसताना काही गोष्टी चुकीच्या घडल्या'- मंत्री गणेश नाईक
महायुती सरकारचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, त्यांची इच्छा नसताना काही गोष्टी चुकीच्या घडल्या, असं नाईक म्हणाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोरच गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंबाबत हे विधान केलं आहे. त्यावेळी चुकीच्या गोष्टी शिंदेंनाही सांगितल्या पण काही गोष्टी नजरेला चांगल्या दिसत नसतानाही सोडून द्याव्या लागतात, असंही नाईक म्हणाले. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, असं नाईकांनी सांगितलं. नाईकांच्या या विधानावर आता शिवसेनेचे नेते काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
9 Jan 2025, 09:47 वाजता
राज्यातील कोणत्याही नागरिकांना कुठूनही दस्त नोंदणी करता येणार..एक राज्य, एक नोंदणी संकल्पना राबवणार..
आता तुम्हाला कोणत्याही कार्यालयातून दस्त नोंदणी करता येणार आहे. राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकांना कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्त नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी एक राज्य एक नोंदणी संकल्पाना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविण्यात येणार आहे. पासपोर्ट कार्यालयाप्रमाणे भूमी अभिलेख विभागातील सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम टप्प्यात ३० कार्यालयांमध्ये भू प्रमाण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
9 Jan 2025, 09:39 वाजता
वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात एक मोठी अपडेट
- खंडणी प्रकरणात पोलिसांनी आरोपी विष्णू चाटे याचे काही व्हॉईस सॅम्पल पोलिसांनी तपास करण्यासाठी घेतले आहेत.
- विष्णू चाटेचा मोबाईल पोलिसांना सापडला नाहीये. त्याचा तपास सध्या सुरू आहे.
- तपास प्रक्रियेत मदत होण्यासाठी आता विष्णू चाटेचे काही व्हॉईस सॅम्पल घेण्यात आले आहेत.
- आज उशिरा आता वाल्मीक कराडचे सुद्धा व्हॉईस सॅम्पल घेतले जाणार आहेत.
- पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यास दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी विष्णू चाटेचे हे व्हॉईस सॅम्पल सीआयडीकडून घेण्यात आले आहेत.
- यातून आता कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून किती खंडणी मागितली, त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले, याचा उलगडा या सगळ्यातून होऊ शकतो.
9 Jan 2025, 09:03 वाजता
देशमुख हत्येप्रकरणी न्यायासाठी संभाजीगरच्या पैठणमध्ये मराठा समाजाचा आज मोर्चा
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज पैठणमध्ये मोर्चा काढण्यात येणारेय. या मोर्चात मनोज जरांगेही सहभागी होणारेत . पैठणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा निघणार आहे.
9 Jan 2025, 09:02 वाजता
13 जानेवारीपासून सुरू होणार देशातील सर्वात मोठं महाकुंभ
Maha Kumbh 2025: महाकुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज शेवटची बैठक घेणार आहेत. सर्व 13 आखाड्यांना योगी भेटही देणार आहेत. 13 जानेवारीपासून देशातील सर्वात मोठं महाकुंभ सुरू होणार आहे. महाकुंभमेळ्यानिमित्त प्रयागराजमध्ये पोलिसांचं मॉकड्रील, गर्दी नियंत्रणासंदर्भात प्रात्यक्षिक, उत्तर प्रदेश पोलीस आणि नागरिकांनाही केलं.
हे ही वाचा: Maha Kumbh 2025: नागा साधूंना थंडी का लागत नाही? जाणून घ्या मनोरंजक उत्तर
9 Jan 2025, 08:41 वाजता
वही हरवली म्हणून तिसरीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून जबर मारहाण
Nashik: क्षुल्लक कारणावरून शिक्षकाने विद्यार्थ्याला जबर मारहाण केल्याची घटना समोर येतेय. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील टाकेहर्ष जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याला वही हरवली म्हणून शिक्षकाने मारहाण केली. शिक्षकावर तात्काळ गुन्हा दाखल करत निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागमी एल्गार कष्टकरी संघटनेने केलीय.
9 Jan 2025, 08:27 वाजता
मुंबई उपनगरात महिलांसाठी चालते-फिरते स्नानगृह
मुंबई उपनगरात महिलांसाठी भारतातील पहिल्या चालत्या फिरत्या स्नानगृहाचं उदघाटन झालं. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते याचं उद्घघाटन करण्यात आलं आहे. महिलांनी यांचा वापर करावा असं आवाहन मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे.
9 Jan 2025, 07:46 वाजता
शिवसेना UBT पक्षाची आजही मातोश्रीवर बैठक, आज बैठकीचा तीसरा दिवस
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. 7 तारखेपासून या बैठकांचं सत्र सुरू आहे. आज या बैठकीचा तिसरा दिवस असून आज वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा इथल्या मतदार संघाचा उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत.
9 Jan 2025, 07:45 वाजता
कागदी आणि प्लास्टिक कपच्या वापरावर बंदी येणार
चहाच्या टपरीवरील पेपर कप लवकरच बंद होणार आहे. कागदी आणि प्लास्टिक कपचा वापर बंद करण्याचं आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केल आहे. आधीपासूनच यावर बंदी आहे मात्र कोणी जर त्याचा वापर करत असेल आरोग्य, पर्यावरण विभाग त्याबाबत जनजागृती करेल असंही आरोग्य मंत्र्यांनी सांगितल आहे.