Breaking News LIVE Updates: जरांगेंना विनंती आहे की...; संभाजी राजेंचं आवाहन

Today Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घडामोडींसहीत देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...

Breaking News LIVE Updates: जरांगेंना विनंती आहे की...; संभाजी राजेंचं आवाहन

11 Oct 2024, 13:38 वाजता

जरांगेंना विनंती आहे की...; संभाजी राजेंचं आवाहन

"जरांगे यांचा आणि आमचा उद्देश एकच आहे. विनंती आहे की पाडायचा राजकारण करू नका. आपले लोक सभागृहात कसे निवडून आणता येईल आणि सभागृहात आपले प्रश्न कसे मांडता येईल या बाजूला सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे," असं माजी राज्यसभा खासदार संभाजी राजेंनी म्हटलं आहे.

11 Oct 2024, 12:32 वाजता

नवी मुंबई विमानतळावर एअरफोर्सच्या विमानाचं यशस्वी लँडिंग

नवी मुंबई विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या सी-295 सुखोई विमानाचं यशस्वीरित्या लँडिंग झालं आहे.

11 Oct 2024, 11:55 वाजता

छगन भुजबळ राजकारणामधून निवृत्त होतायेत?

राष्ट्रवादी काँग्रेस आजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपणास आता आराम करायचा असल्याचं सांगितलं आहे. एकूणच राजकारणातून अप्रत्यक्षपणे निवृत्तीचे संकेत त्यांनी दिले आहेत. सामाजिक कार्याची जबाबदारी मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांनी घ्यावी, राजकारणात स्वतःच्या निर्णय क्षमतेवर पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. मनमाडमधील संगीतकार अजय-अतुलच्या कार्यक्रमावेळी त्यांनी आपली मतं व्यक्त केली. मात्र एकूणच भुजबळ हे खरोखर गंभीर आहेत की निवडणुकीच्या तोंडावर नेहमीप्रमाणे भावनिक साद मतदारांना घातली आहे याची चर्चा रंगली आहे. 

11 Oct 2024, 11:49 वाजता

शरद पवारांना माढा मतदारसंघातील उमेदवार सापडला?

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला माढा मतदारसंघातून उमेदवार सापडला की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले अभिजित पाटील यांनी सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. 

11 Oct 2024, 11:42 वाजता

राज्यात एकाच दिवशी 6 दसरा मेळावे; कोण कुठे बोलणार पाहा यादी

दसऱ्यानिमित्त राज्यात सहा मेळावे. मुंबईपासून बीडपर्यंत मेळावे होणार आहेत. कोण कुठे घेणार आहे मेळावा पाहा खालील यादी...

शिवाजी पार्कवर – उद्धव ठाकरे- 
आझाद मैदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नारायण गड, बीड – मनोज जरांगे-पाटील, 
भगवान भक्ती गड, बीड  – पंकजा मुंडे 
धम्मचक्र प्रवर्तन दिन, नागपूर - दीक्षा भुमी 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, नागपूर – रेशीमबाग

11 Oct 2024, 11:33 वाजता

10 दिवसात शिंदे सरकारचे 1291 जीआर; निधीसाठी विभागांची धावपळ

आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून गेल्या दहा दिवसांत 1291 शासन निर्णय जारी करण्यात आले. आचारसंहिता लागेपर्यंत शासन निर्णयाचा राज्य सरकारकडून धडाका लावण्यात आला आहे.  विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रलंबित राहिले सर्व निर्णय जाहीर करण्याच्या राज्य सरकारचा मानस दिसत आहे. राज्य सरकारकडून रेकॉर्ड ब्रेक निर्णय घेतलेला असताना निधीबाबत वित्त विभागासमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सर्वच विभागांची वर्क ऑर्डर काढण्याची लगबग सुरु आहे.

आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेले शासन निर्णय तारखेप्रमाणे -

1 ऑक्टोबर   -148 शासन निर्णय 

 2 ऑक्टोबर - शासकीय सुट्टी

 3 ऑक्टोबर  203 शासन निर्णय 

 4 ऑक्टोबर - 188 शासन निर्णय 

 5  ऑक्टोबर  - 2 शासन निर्णय 

6  ऑक्टोबर  - शासकीय सुट्टी

7  ऑक्टोबर  -209 शासन निर्णय 

 8  ऑक्टोबर - 150 शासन निर्णय 

 9  ऑक्टोबर -197 शासन निर्णय 

 10 ऑक्टोबर - 194 शासन निर्णय 

 दहा दिवसात एकूण शासन निर्णय  -1291

11 Oct 2024, 11:28 वाजता

दसऱ्यानिमित्त राज ठाकरे साधणार संवाद पण...

पहिल्यांदाच राज ठाकरे दसऱ्याच्या दिवशी संवाद साधणार आहेत. उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे पॉडकास्ट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे करणार पॉडकास्टच्या माध्यमातून भाष्य करणार आहेत. 

11 Oct 2024, 11:11 वाजता

नाशिकमध्ये स्फोट! दोन अग्निवारांचा मृत्यू

नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये सरावादरम्यान ब्लास्ट झाला आहे. यामध्ये दोन अग्निविरांचा मृत्यू झाला आहे. फायरिंगचा सराव करताना स्फोट झाला. या अपघातात गोहील सिंह, सैफत शीत या अग्नीवीरांचा स्फोटात मृत्यू झाला आहे. ही घटना काल म्हणजेच 10 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी घडल्याचं सांगितलं जात आहे. फायरिंगचा सराव करत असताना घटना घडली. सेल फायर करत असताना सेल ब्लास्ट झाला.

11 Oct 2024, 10:21 वाजता

स्वराज्य पक्षाकडून मविआ, महायुतीविरुद्ध फ्लेक्सबाजी

पुण्यात स्वराज्य पक्षाने शक्तीप्रदर्शन केलं आहे. पुण्यात स्वराज्य पक्षाकडून महाविकास आघाडी आणि महायुतीच वाभाडे काढणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. आज स्वराज्य पक्षाचा स्थापना दिवस होत असताना शहरात फ्लेक्स झळकलेत. आठवतंय का म्हणत सर्वच राजकीय पक्षांनी सत्तेसाठी विचारांशी गद्दारी केल्याची उदाहरणांचा उल्लेख फ्लेक्सवर आहे. अशी फसवणूक नको असेल तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला साथ द्या म्हणत फ्लेक्स लावले आहेत.

11 Oct 2024, 08:54 वाजता

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट; मैदानात चिखल

शिवसेना दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याला पावसाचे सावट आहे. ठाकरे गटाच्या शिवाजी पार्क येथील होणार आहे. दसरा मेळाव्यापूर्वी काल रात्री पडलेल्या पावसामुळे शिवाजी पार्क मैदानात चिखल झाला आहे. प्रवेशद्वारावर समोरच चिखल झाल्याने या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या शिवसैनिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.