Breaking News LIVE Updates: जरांगेंना विनंती आहे की...; संभाजी राजेंचं आवाहन

Today Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घडामोडींसहीत देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...

Breaking News LIVE Updates: जरांगेंना विनंती आहे की...; संभाजी राजेंचं आवाहन

11 Oct 2024, 08:53 वाजता

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यावरुन सरकारला उच्च न्यायालयाची नोटीस

मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या अधिसूचनेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची न्यायालयाने आज दखल घेतली. याचिकेत दुरुस्ती करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली. न्यायालयाने त्यास मुभा देऊन सरकारला नोटीस बजावली आणि याचिकेवर चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले.

11 Oct 2024, 08:48 वाजता

71 फूट उंचीच्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा

महाराष्ट्रातील सर्वात उंच 71 फूट उंचीच्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा आज सायंकाळी तपोवन परिसरात भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

11 Oct 2024, 08:48 वाजता

68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर सज्ज; 5000 पोलीस तैनात

दीक्षाभूमी 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी सज्ज झाली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा 12 तारखेला असला तरी आतापासूनच दीक्षाभूमीवर विविध राज्यातील अनुयायांनी पोहचण्यास सुरुवात केली आहे. दीक्षाभूमीत तीन   दिवसीय धम्मदिक्षा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान, दीक्षाभूमी आणि विजयादशमी उत्सवाच्या दृष्टीने शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले आहे.

11 Oct 2024, 08:48 वाजता

फुकट्या पुणेकरांविरोधात रेल्वेची मोठी कारवाई; तब्बल 1 लाख 71 जणांना दंड

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने फुकट्या प्रवाशांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत 1 लाख 71 हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल 10 कोटी 73 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे विभागात सप्टेंबर महिन्यात तिकीट तपासणी मोहिमेत 20 हजार 569 प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून 80 लाख 81 हजार 850 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याचबरोबर अनियमित प्रवास करणाऱ्या 2 हजार 986 प्रवाशांकडून 11 लाख 50 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला

11 Oct 2024, 08:45 वाजता

दिवाळी, छठ पूजेनिमित्त 6556 विशेष रेल्वेगाड्या

दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ पुजेदरम्यान प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी भारतीय रेल्वेवरून 6556 विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

11 Oct 2024, 08:45 वाजता

राज्यपाल नांदेड दौऱ्यावर

राज्यपाल सी पी राधाकृष्णन उद्या नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. पेसा कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा राज्यपाल घेणार आहेत. त्यांनतर शासकीय विश्रामगृहात विविध बैठका घेणार आहेत.

11 Oct 2024, 08:45 वाजता

‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य

गुरुवारी केरळ विधानसभेने एक ठराव मंजूर केला ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला संपूर्ण भारतभर एकाच वेळी राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक निवडणुका घेण्याबाबत उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी स्वीकारण्याचा निर्णय रद्द करण्याचे आवाहन केले आहे, कारण हा प्रस्ताव लोकशाहीविरोधी आहे असे म्हटले आहे.

11 Oct 2024, 08:37 वाजता

आज नवी मुंबई विमानतळावर उड्डाण चाचणी

नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे विमानतळ उड्डाण चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर चाचणी विमानतळ प्रकल्पस्थळी दुपारी 3 ते 4 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

11 Oct 2024, 08:37 वाजता

शिर्डीचं साईमंदिर 'या' दिवशी 24 तास राहणार सुरु

शिर्डीत आजपासून तीन दिवसीय साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी साईमंदिर असणार रात्रभर दर्शनासाठी सुरु राहणार आहे. पहाटेच्या काकड आरतीने उत्सवाची सुरुवात होणार आहे.