Maharashtra Breaking News LIVE Updates: पुणे-सातारा महामार्गावरील टोलनाक्यावर पकडली 5 कोटींची रोकड

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्याच्या राजकारणापासून इतर सर्वच क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्यांच्या ताज्या अपडेट्स...   

Maharashtra Breaking News LIVE Updates: पुणे-सातारा महामार्गावरील टोलनाक्यावर पकडली 5 कोटींची रोकड

Maharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभा निवडणुकीसाठी आता महिन्याभराचा कालावधी उरला असतानाच सत्ताकारण नवनवीन वळणांवर येताना दिसत आहे. काय आहेत राज्यातील महत्त्वाच्या आणि लक्ष देण्याजोग्या घडामोडी... पाहा एका क्लिकवर.... 

21 Oct 2024, 09:28 वाजता

राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाची पहिली संभाव्य यादी समोर 

राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली संभाव्य यादी समोर आली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन टोकाचे मतभेद असल्याने शरद पवार मध्यस्थी करत असतानाच दुसरीकडे त्यांच्या पक्षाची संभाव्य यादी समोर आली आहे. 

(संपूर्ण यादी पाहण्यासाठी इथं क्लिक करा)

21 Oct 2024, 09:08 वाजता

आंबेगावातून वळसे पाटील यांच ठरलं

अखेर दिलीप वळसे पाटील यांचं ठरलं असून आंबेगाव विधानसभेतून दिलीप वळसे पाटील 24 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मी माझ्या कामावरती लढत असतो त्यामुळे समोर कोण उमेदवार आहे याकडे लक्ष देत नाही अशा शब्दात वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. 

21 Oct 2024, 08:34 वाजता

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून लढणार. 

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून लढणार.  विधानसभा निवडणुकीसाठी 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार.  अजित पवार हे बारामतीतून निवडणूक न लढण्याचे संकेत देत होते मात्र अखेर ते बारामतीतूनच विधानसभेची निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले असून सोमवारी 28 ऑक्टोबरला विधानसभेचा उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठीची तयारीही सुरू करण्यात आली आहे.

21 Oct 2024, 08:23 वाजता

भाजपचे 17 आमदार वेटिंगवरच... 

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 99 उमेदवारांची पहिली यादी आज (दि. 20) जाहीर झाली आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु, या यादीत अकोट, अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, कारंजा, वाशिम, आर्वी, नागपूर मध्य, गडचिरोली, आर्णी, नाशिक मध्य, उल्हासनगर, बोरिवली, वर्सोवा, घटकोपर पूर्व, पेण, पुणे छावणी, गेवराई, माळशिरस या मतदारसंघातील विद्यमान आमदारांना संधी देण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.

21 Oct 2024, 08:15 वाजता

भाजपच्या पहिल्या यादीत नाव नसल्याने आमदारांसह इच्छुकांत अस्वस्थता

 

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने काल राज्यातील 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एकाही मतदारसंघातील उमेदवाराचा समावेश नसल्याने विद्यमान आमदारांसह इच्छुक उमेदवारांच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरल्याचे दिसून येते आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय हालचालींना चांगलाच वेग धरला आहे. 

 

21 Oct 2024, 08:07 वाजता

आज पवार काका- पुतण्यांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

शरद पवार गटाची आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. आज महा विकास आघाडीच्या काही जागा जाहीर होतील अशी माहिती आमदार अनिल देशमुख यांनी दिली होती. शरद पवार यांच्या पक्षाच्या पहिल्या यादीत 50 उमेदवारांच्या नावांची होणार घोषणा. अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता तर दादांच्या मंत्रांच्या विरोधात शरद पवार कोणाला रिंगणात उतरवणार हे आज पहिल्या यादीतून होणार स्पष्ट होईल. 

सोबतच, अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. काल रात्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात बैठक पार पडली या बैठकीत यादी जाहीर करण्यात संदर्भात झाली चर्चा. पहिल्या यादीत जवळपास 30 ते 40 उमेदवारांच्या नावांची होणार घोषणा. या यादीत वाद नसलेल्या जागा आणि विद्यमान आमदारांचा असणार समावेश. 

21 Oct 2024, 07:40 वाजता

नागपूर जिल्ह्यात काँग्रेसची नवी रणनिती 

नागपूर जिल्ह्यात काँग्रेसनं नवी रणनिती आखली. नागपूर जिल्ह्यातील 6 पैकी 3 मतदारसंघात काँग्रेस महिला उमेदवार देण्याची शक्यता आहे. खास करून ग्रामीण भागात काँग्रेसचा नेतृत्व करणा-या सुनील केदारांनी त्यांच्या अनेक महिला कार्यकर्त्यांना यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केलीये. कामठी मतदारसंघातून अवंतिका लेकुरवाळे, हिंगणा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यास कुंदा राऊत आणि उमरेड किंवा इतर एका मतदारसंघातून रश्मी बर्वे या उमेदवार असू शकतील अशी चर्चा आहे.

21 Oct 2024, 07:05 वाजता

दक्षिण मुंबईत भाजपला मोठा धक्का

विधानसभा निवडणुकीआधी दक्षिण मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेची यादी जाहीर होताच भाजपात पहिली बंडखोरी झाली असून, माजी मंत्री राज पुरोहित महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला दिली आहे. पुरोहित कुलाबा मतदारसंघातून इच्छूक असून, त्यांनी उमेदवारीसाठी भाजप नेतृत्वाकडे मागणीही केली होती. राज पुरोहित मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष तसेच ज्येष्ठ नेते असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज पुरोहित कुलाबा विधानसभा निवडणुक लढवण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. 

21 Oct 2024, 06:59 वाजता

निलेश राणे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश?

माजी खासदार निलेश राणे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी कुडाळ-मालवण मतदारसंघातून तयारीही सुरू केलीये. मात्र, महायुतीत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे निलेश राणेंची मोठी कोंडी झाली आहे. निलेश राणेंना भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी राणे पिता पुत्रांनी भाजप नेत्यांकडे आग्रह धरलाय.

 

21 Oct 2024, 06:56 वाजता

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

विधानसभा निवडणुकीत विद्यार्थ्यांना मतदान करता यावे यासाठी मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १९ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबरला होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र, या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. परिणामी, विद्यार्थ्यांना मतदानापासूनच वंचित राहावे लागले असते. तसेच मुंबई वगळता अन्य जिल्ह्यांतील बहुतांश विद्यार्थ्यांचे मतदान गावी असल्याने त्यांना या कालावधीत प्रवास करून गावी जाणे शक्य नव्हते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती.