Maharashtra Political Crisis : राज्यपालांनी त्यांच्या मर्यादेत राहावे - CJI DY चंद्रचूड

Shinde vs Thackeray Crisis Live Updates:  राज्यातील सत्तासंघर्षावरील मंगळवारपासून सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी आज पुन्हा सुरु होणार आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करत आहेत. आता  शिंदे गट आणि राज्यपालांच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. त्यामुळं आता सुप्रीम कोर्ट या राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात काय निकाल देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Maharashtra Political Crisis : राज्यपालांनी त्यांच्या मर्यादेत राहावे - CJI DY चंद्रचूड

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Crisis Live Updates: राज्यातील सत्तासंघर्षावरील मंगळवारपासून सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी आज पुन्हा सुरु होणार आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करत अनेक कायदेशीर मु्द्दे कोर्टात मांडण्यात आले होते. त्यानंतर आता  या प्रकरणावर  सुनावणी सुरु आहे. ठाकरे गटाच्या वकिलांचा संपूर्ण युक्तिवाद संपल्यानंतर आता पुढील सुनावणीवेळी शिंदे गट आणि राज्यपालांच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. त्यामुळं आता सुप्रीम कोर्ट या राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात काय निकाल देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

15 Mar 2023, 11:52 वाजता

Maharashtra Political Crisis Updates :  एक राजकीय पक्ष आणि दुसरा विधिमंडळ पक्ष आहे. विधिमंडळ पक्षाने एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती केली आहे, असा युक्तिवाद शिंदे गटाने केलाय.

15 Mar 2023, 11:51 वाजता

सॅालिस्टर जनरल तुषार मेहता यांनी 7 मुद्दे मांडले..

1. राज्यपालांना दिलेली वस्तुनिष्ठ सामग्री आहे.

2. राज्यपाल दहावी अनुसूची आणि त्यामुळे निर्माण होणा-या परिणामांशी संबंध नाही.

3. राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट घेण्यास सांगण्याऐवजी अविश्वास प्रस्ताव आणण्याची आवश्यकता होती ?

15 Mar 2023, 11:51 वाजता

4. राज्यपालांना फ्लोर टेस्टसाठी बोलावण्याचा अधिकार सरकार स्थापन होण्यापूर्वीच असतो. शिवराजसिंह चौहान केसमध्ये आले आहे. तो चांगला कायदा आहे.

5. राज्यपालांनी पक्षाच्या प्रमुखांना नाही तर एकनाथ शिंदे यांना का आमंत्रित केले.

15 Mar 2023, 11:10 वाजता

Maharashtra Political Crisis Updates : सत्ता संघर्षाची सुनावणी : आज राज्यपालांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहता युक्तीवाद करणार आहेत. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास शिंदेंना का सांगितले यावर युक्तीवाद होईल?

15 Mar 2023, 11:02 वाजता

 राज्याच्या सत्तासंघर्षावर सुरू असलेली सुनावणी आज संपणार 

Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावर सुरू असलेली सुनावणी आज संपणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. आता निकालाच्या तारखेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिंदे गटाच्या वतीने काल ज्येष्ठ वकील हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला. राज्यपालांच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता आज युक्तिवाद करणार आहेत.10-15 मिनिटांमध्ये मुद्दे मांडू असं मेहता यांनी सरन्यायाधीशांना सांगितलं आहे. मेहतांच्या युक्तिवादानंतर कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी रिजॉईंडर मांडणार आहेत.