निवडणुकीआधी राष्ट्रवादी शरद पवार पक्षला मोठा दिलासा; निवडणूक आयोगानं दिला अत्यंत महत्वाचा निर्णय

Sharad Pawar NCP : पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी शरद पवारांच्या तुतारीला लोकसभेत मोठा फटका बसला होता. चिन्ह साधर्म्यामुळे निवडणुकीत फटका बसल्याचा दावा शरद पवारांच्या पक्षानं केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं निवडणूक आयोगात धाव घेतली. आता निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलासा दिलाय. ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचं भाषांतर ट्रम्पेट असंच राहणार आहे, असं आयोगानं म्हटलंय

वनिता कांबळे | Updated: Nov 1, 2024, 11:01 PM IST
निवडणुकीआधी राष्ट्रवादी शरद पवार पक्षला मोठा दिलासा; निवडणूक आयोगानं दिला अत्यंत महत्वाचा निर्णय title=

Maharashtra Assembly Elections 2024 : राष्ट्रवादी शरद पवार पक्ष लोकसभेला तुतारी चिन्हावर सामोरा गेला.  मात्र काही मतदारसंघात तुतारीसमोर पिपाणी चिन्ह आल्यामुळे शरद पवार पक्षाला फटका बसला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना निवडणूक आयोगानं दिलासा दिलाय. ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचं भाषांतर ट्रम्पेट असंच राहणार आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा दिलासा मिळालाय . ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचं भाषांतर मराठीत तुतारी असं करण्यात आलं. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं निवडणूक चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे.

मात्र या 2 निवडणूक चिन्हांमुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याचा दावा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं केला होता. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्पेटचं भाषांतर ट्रम्पेट असंच करून निवडणूक आयोगानं शरद पवारांच्या पक्षाला दिलासा दिलाय. ट्रम्पेट चिन्हामुळे अनेकांचा गोंधळ उडाल्याचा दावा शरद पवारांनी केलाय.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत करून आमची मागणी योग्य होती अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलीय. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात पिपाणी चिन्हामुळे तुतारीला फटका बसला होता. 

लोकसभा निवडणुकीत चिन्हामुळे गोंधळ होऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला फटका बसला. त्यामुळे सावध होऊन पक्षानं निवडणूक आयोगात धाव घेतली होती. अखेर निवडणूक आयोगानं ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचं भाषांतर ट्रम्पेट असंच राहणार असल्याचा निर्णय दिलाय. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत पवारांना दिलासा मिळालाय.

लोकसभा निवडणुकीत असा फटका बसला

सातारा लोकसभेत भाजपच्या उदयनराजे भोसलेंचा विजय झाला. तुतारी चिन्हावर निवडणूक लढवलेल्या शशीकांत शिंदेंचा 32 हजार 771 मतांनी पराभव झाला. तर तिथं पिपाणी चिन्हावर लढलेल्या संजय गाडे यांना 37 हजार 62 मतं मिळाली होती

- दिंडोरीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भास्कर भगरे 1 लाख 13 हजार 199 मतांनी विजयी झाले. भाजपच्या भारती पवारांचा त्यांनी पराभव केला. मात्र इथं पिपाणी चिन्हावर उभे असलेल्या बाबू भगरे यांनी तब्बल 1 लाख 3 हजार 632 मतं मिळवली होती.

- दक्षिण अहमदनगरमध्ये पिपाणीवर लढलेल्या गोरख आळेकर यांना 44 हजार 597 मतं मिळाली होती, तर रावेरमध्ये पिपाणीवर लढलेल्या एकनाथ साळुंखेंनी 43 हजार 957 मतं घेतली होती

- माढ्यात पिपाणी चिन्हाला 58 हजार 421 मतं मिळाली, बीडमध्ये पिपाणीवर लढलेल्या अशोक थोरात यांना 54 हजार 850 मतं मिळाली होती..तर पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत पिपाणी चिन्हाला 14 हजार 917 मतं मिळाली होती