Maharashtra Political Crisis: येत्या तीन ते चार दिवसात मंत्री मंडळ विस्तार होणार, याच आठवड्यात शपथविधी

Maharashtra Political Crisis Live Update: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.    

Maharashtra Political Crisis: येत्या तीन ते चार दिवसात मंत्री मंडळ विस्तार होणार, याच आठवड्यात शपथविधी

Maharashtra Political Crisis Update: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते. आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे. 

 

 

2 Jul 2023, 16:03 वाजता

Sharad Pawar Live : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून भूमिका मांडली. आता थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद आहे. 

2 Jul 2023, 15:58 वाजता

Ajit Pawar Deputy CM Live : राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, विकासाला प्राधान्य द्यावं म्हणून हा निर्णय घेतला आहे. अजून मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असंही ते यावेळी म्हणाले.  राष्ट्रवादीतील बहुसंख्य आमदार माझ्यासोबत असून मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिली होता. राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी होणार आहे. 

2 Jul 2023, 15:39 वाजता

Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. ते म्हणाले की, ''आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला . उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?''

 

2 Jul 2023, 15:26 वाजता

Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, युवक आणि महिला हे शरद पवार यांच्याबरोबर आहेत. आज जो शपथविधीचा कार्यक्रम पार पडला, तो ऑपरेशन लोटसचा भाग होता. त्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रवक्ता महेश तपासे यांनी दिली आहे. 

2 Jul 2023, 15:19 वाजता

Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE : ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते, त्यांनाच मंत्रिपदाची शपथ दिली, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी दिली आहे. 

2 Jul 2023, 15:14 वाजता

Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE : अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

2 Jul 2023, 15:09 वाजता

Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात अजित पवार आणि मी आम्ही तिघही मिळून विकास करणारं सरकार देऊ, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

2 Jul 2023, 14:52 वाजता

Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE : अजित पवारानंतर छगन भुजबळ

दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मा आत्रम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबुराव बनसोडे यांनी मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. 

2 Jul 2023, 14:42 वाजता

Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE : पहाटेचा शपथविधी अखेर प्रत्यक्षात उतरला! अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

2 Jul 2023, 14:36 वाजता

Maharashtra Political Crisis Update: छगन भुजबळांनी घेतली मंत्रीपदाची शपथ