Maharashtra Political Crisis Update: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते. आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे.
2 Jul 2023, 14:32 वाजता
Maharashtra Political Crisis Update: अजित पवार सरकारमध्ये सहभागी, घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
2 Jul 2023, 14:27 वाजता
Maharashtra Political Crisis Update: अजित पवार राजभवनात दाखल, काही बोलण्यास नकार
2 Jul 2023, 14:20 वाजता
Maharashtra Political Crisis Update: संजय राऊतांची शरद पवारांशी चर्चा
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले" मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू". होय,जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार… pic.twitter.com/fsBbIZGoFE— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023
2 Jul 2023, 14:12 वाजता
Maharashtra Political Crisis Update: मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्राला मजबूत कऱण्यासाठी हे समीकरण जुळवण्यात आलं आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान
2 Jul 2023, 14:10 वाजता
Maharashtra Political Crisis Update: सूत्रांच्या माहितीनुसार, सुप्रिया सुळेंनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. तरीही अजित पवार आमदारांसह शपथविधी समारंभात पोहोचले. शरद पवारांचा पाठिंबा नाही अशी माहिती मिळत आहे.
2 Jul 2023, 14:07 वाजता
Maharashtra Political Crisis Update: अजित पवार प्रशासनात काम करणारं एक नेतृत्व आहे. अडीच वर्षांचा कारभार त्यांनी पाहिला आहे. अजित पवार यांनी गतिमान सरकारमध्ये राहण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असेल असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
2 Jul 2023, 14:02 वाजता
Maharashtra Political Crisis Update: राजभवनातील अधिकाऱ्यांना लवकर येण्याच्या सूचना, 4 वाजता शपथविधी होण्याची शक्यता
2 Jul 2023, 13:58 वाजता
Maharashtra Political Crisis Update: राजभवनात शपथविधीची तयारी सुरु असल्याचा फोटो समोर
2 Jul 2023, 13:57 वाजता
Maharashtra Political Crisis Update: सुप्रिया सुळे फोनवरुन शरद पवारांच्या संपर्कात, शरद पवार सध्या रोहित पवारांसह पुण्यात
2 Jul 2023, 13:56 वाजता
Maharashtra Political Crisis Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण बाहेर आल्यावर सविस्तर सांगू अशी माहिती दिली आहे.