Maharashtra Political Crisis Update: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते. आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे.
2 Jul 2023, 13:53 वाजता
Maharashtra Political Crisis Update: अजित पवार यांच्यासोबत कोण आमदार आहेत?
दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे
2 Jul 2023, 13:51 वाजता
Maharashtra Political Crisis Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनात दाखल
2 Jul 2023, 13:48 वाजता
Maharashtra Government Live Update: अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, विश्वसनीय सुत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. शिवसेना आणि भाजपाचेही प्रत्येकी तीन ते चार जण शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
- ‹ previous
- 1
- 2
- 3
- 4