Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates: चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप मोठ्या मताधिक्याने विजयी

Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates: कसबा पेठ पोटनिवडणुकीत मविआचे रवीेंद्र धंगेकर विजयी. तर चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे (Kasba Chinchwad By Election Results)    

Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates: चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप मोठ्या मताधिक्याने विजयी

Pune Kasba Chinchwad Bypoll Election Results 2023 Live Updates : पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात कसबा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर पाहिला मिळाला असून भाजपला बालेकिल्ल्यातच धक्का बसला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवीेंद्र धंगेकर मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपने आपला बालेकिल्ला कायम ठेवला असून अश्विनी जगताप यांचा मोठा विजय झाला आहे. अश्विनी जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा दारुण पराभव केला आहे. 

 

 

2 Mar 2023, 11:36 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूक मतमोजणी. महा विकास आघिडचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडे मोठी आघाडी. सोळाव्या फेरीअखेर धंगेकर यांना 56497 मतांची आघाडी, तर भाजपचे हेमंत रासने यांना 50490 मतं. धंगेकर 6957 मतांनी आघाडीवर,रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, गुलाल उधळत विजयाच्या आधीच कार्यकर्त्यांचा जल्लोष

2 Mar 2023, 11:25 वाजता

2 Mar 2023, 11:08 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी, भाजपच्या अश्विनी जगताप यांची आघाडी कायम. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पिंपरी-चिंचवडवर कुणा एका व्यक्तीच प्रभाव राहिलेला नाही, हे स्पष्ट होतंय. भाजपाने केलेल्या कामांचा हा विजय असेल. राहुल कलाटेंना थांबवण्याचा बराच प्रयत्न झाल, जर ते उभे राहिले नसते तर त्यांची मतंही भाजपालाच मिळआली असतं असं आमदार महेश लांडगे यांनी म्हटलं आहे. 

2 Mar 2023, 10:54 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : 11  व्या फेरीअखेर धंगेकरांना 3122 मतांची आघाडी

चिंचवड पोटनिवडणूक निकाल  मतं 
अश्विनी जगताप (भाजप)   32088
नाना काटे (राष्ट्रवादी)  35832
राहुल कलाटे (अपक्ष)  10961

 

कसबा पोटनिवडणूक निकाल मतं 
हेमंत रासने (भाजप) 37784
रवींद्र धंगेकर  (महाविकास आघाडी) 41771

 

2 Mar 2023, 10:49 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूक मतमोजणी. महा विकास आघिडचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पेठेतील नागरिकांनी दिला भरघोस प्रतिसाद. पुण्यातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या पेठेतील अनेक परिसरातून धंगेकर आघाडीवर. कसबा, शनिवार, सदाशिव, नवी पेठ काही भाग, अल्पना टॉकीज, बुधवार पेठ, रविवार पेठ, गणेश पेठ, डोके तालीम, बोहरी आळी, रामेश्वर चौक, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता या ठिकाणाहून धंगेकर यांना आघाडी

2 Mar 2023, 10:48 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी, भाजपच्या अश्विनी जगताप यांची आघाडी कायम. नवव्या फेरीअखेर जगताप 6356 मतांनी आघाडीवर. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे दुसऱ्या तर अपक्ष राहुल कलाटे तिसऱ्या स्थानावर

2 Mar 2023, 10:39 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूक मतमोजणी. भाजपचे प्राबल्य असलेल्या पेठांमध्ये काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना आघाडी. अनेक ठिकाणी धंगेकरांचं मताधिक्य अधिक, भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर
नारायण पेठेतील एका बुथवर चक्क धंगेकरांना आघाडी
614 मतांपैकी
470 धंगेकर 
141 रासणे

2 Mar 2023, 10:34 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी, भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर. पुणे शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. राहुल कलाटेंच्या बंडखोरीच्या परिणामाची भीती होती, म्हणूनच आम्ही शेवटपर्यंत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होतो, दोन्ही उमेदवारांची मतं एकत्र केल्यास विजय सोपा झाला असता. आदित्य ठाकरेंची सभा, रॅल यामुळे कडवी टक्कर देता येत आहे.

 

2 Mar 2023, 10:27 वाजता

चिंचवड पोटनिवडणूक निकाल  मतं 
अश्विनी जगताप (भाजप)   24925
नाना काटे (राष्ट्रवादी)  20945
राहुल कलाटे (अपक्ष)  9255

 

कसबा पोटनिवडणूक निकाल मतं 
हेमंत रासने (भाजप) 27708
रवींद्र धंगेकर  (महाविकास आघाडी) 30144

2 Mar 2023, 10:25 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूक मतमोजणी. नवव्या फेरीनंतर काँग्रेसचे रविंद्र धंगेकर आघाडीवर, नवव्या फेरीनंतर धंगेकर 3300 मतांची आघाडी. धंगेकर यांना आतापर्यंत 30000 मतं तर हेमंत रासने यांना 27175 मतं. आनंद देव यांना 75 मतं. अभिजीत बिचुकले यांना 4 मतं.