Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates: चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप मोठ्या मताधिक्याने विजयी

Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates: कसबा पेठ पोटनिवडणुकीत मविआचे रवीेंद्र धंगेकर विजयी. तर चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे (Kasba Chinchwad By Election Results)    

Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates: चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप मोठ्या मताधिक्याने विजयी

Pune Kasba Chinchwad Bypoll Election Results 2023 Live Updates : पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात कसबा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर पाहिला मिळाला असून भाजपला बालेकिल्ल्यातच धक्का बसला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवीेंद्र धंगेकर मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपने आपला बालेकिल्ला कायम ठेवला असून अश्विनी जगताप यांचा मोठा विजय झाला आहे. अश्विनी जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा दारुण पराभव केला आहे. 

 

 

2 Mar 2023, 07:49 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election 2023 Live Updates : कसब्याची मतमोजणी कोरेगाव पार्क येथे सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

2 Mar 2023, 07:20 वाजता

Pune Bye Poll Election Results LIVE Update : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकालामुळे कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी कोरेगाव पार्क भागातील अन्न धान्य महामंडळाचे गोदाम तसेच शहरातील मध्यभागात पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास पोलिसांकडून मनाई केली आहे.

 

2 Mar 2023, 07:15 वाजता

Pune Bye Poll Election Results Live Updates : कसब्याची मतमोजणी अन्न महामंडळाच्या गोदामात होणार आहे. इथं मतमोजणीच्या 20 फे-या होतील. तर चिंचवडची मतमोजणी थेरगाव इथल्या शंकर आण्णा गावडे कामगार भवन इथं होणार आहे. मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी एक टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 

2 Mar 2023, 06:56 वाजता

Pune Bye Poll Election Results LIVE Update :  चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणीसाठी चिंचवड आणि कसब्यात जय्यत तयारी करण्यात आलीय. कसब्याची मतमोजणी अन्न महामंडळाच्या गोदामात होणार आहे. तर चिंचवडच्या  मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 टेबल आणि टपाली मतपत्रिकांसाठी एक असे एकूण 15 टेबल असणार आहेत.