Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादीच्या सदस्यीय समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आलाय...राजीनामा एकमताने नामंजूर करून पवारांकडे पाठवण्यात आलाय...अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपेपर्यंत पदावरच राहावं असा ठराव पारित करण्यात आलाय...पवार हे देशाचे नेते आहेत...त्यांची राज्यासह देशाला गरज आहे...त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदी राहावं अशी भावना सगळ्यांची आहे...
5 May 2023, 11:30 वाजता
कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, एकच गोंधळ
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात एका कार्यकर्त्यांने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी हा कार्यकर्ता आक्रमक झाला होता. त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याला अन्य कार्यकर्त्यांनी त्याला बाजुला नेले. दरम्यान, पोलीसही घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलेय.
5 May 2023, 11:19 वाजता
शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्यात आलाय
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात निवड समिती सदस्यांची बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांची 11.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान, शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्यात आला आहे.
5 May 2023, 11:14 वाजता
बैठकीसाठी सर्वच दिग्गज नेते उपस्थित
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात निवड समिती सदस्यांची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीसाठी सर्वच दिग्गज नेते उपस्थित आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात निवड समिती सदस्यांची बैठक सुरु झाली आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात ही बैठक होते आहे. या बैठकीसाठी सर्वच दिग्गज नेते उपस्थित आहेत. #NCP #SharadPawar #SharadPawarResigns pic.twitter.com/r8euMbe64c
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 5, 2023
5 May 2023, 11:01 वाजता
राष्ट्रवादी निवड समितीच्या नेत्यांची बैठक सुरु
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात निवड समिती सदस्यांची बैठक सुरु झाली आहे. शरद पवार हेच अध्यक्ष राहावेत असा ठराव मंजूर करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात ही बैठक होते आहे. या बैठकीसाठी अजित पवार, अनिल देशमुख, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड बैठकीसाठी उपस्थित आहेत. शरद पवार यांनी अध्यक्षपदी कायम राहावं अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे ही समितीही पवारच अध्यक्ष राहावेत असा ठराव मंजूर करणार आहे.
5 May 2023, 10:56 वाजता
शरद पवार अध्यक्षपदी कायम राहणार?
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : शरद पवार हेच अध्यक्ष राहावेत असा ठराव मंजूर करणार असल्याची माहिती छगन भुजबळांनी दिली आहे. शरद पवारांशिवाय दुसरा पर्याय नाही, देशातील विरोधी नेत्यांचीही तीच मागणी आहे. त्यामुळे शरद पवार अध्यक्षपदी कायम राहणार असल्याची माहिती भुजबळांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड दाखल झालेत. तर सुप्रिया सुळेही बैठकीसाठी पोहोचल्या आहेत. आज बैठकीत प्रस्ताव पारित करून पवारांना कळवला जाणार आहे. शरद पवार वाय बी सेंटरला कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत.
5 May 2023, 10:51 वाजता
कार्यकर्त्यांचे प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.
राष्ट्रवादाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत । शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. राजीनामा मागे घ्या.... निर्णय मागे घ्या अशा घोषणा कार्यकर्ते देत आहेत.#NCP #SharadPawar #SharadPawarResigns pic.twitter.com/jAiIOpIrw3
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 5, 2023
5 May 2023, 10:45 वाजता
सुनील तटकरे, एकनाथ खडसे कार्यालयात दाखल
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन कार्यकर्ते करत आहेत. कार्यालयाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी बैठकीसाठी खासदार सुनील तटकरे, एकनाथ खडसे, अनिल देशमुख आणि नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे आदी नेते कार्यालयात दाखल झालेत.
5 May 2023, 10:42 वाजता
मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवकचा ठराव
राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी आग्रह होत आहे. अनेक ठिकाणी तसे ठरावही करण्यात आले आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मागणी करताना ठराव केला आहे. हा ठराव आजच्या बैठीत ठेवण्यात येणार आहे.
5 May 2023, 10:39 वाजता
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अजित पवार भाजपमध्ये सामील होतील या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. राणे यांचे वक्तव्य तथ्यहीन आहे. त्यात कुठलीही सत्यता नाही, असे नेते प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे.
5 May 2023, 10:34 वाजता
आम्ही राजीनामा नामंजूर करणार - भुजबळ
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : शरद पवार यांचा राजीनामा ना मंजूर करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव आम्ही ठेवणार आहोत. आज प्रदेश कार्यालयात कमिटी प्रस्ताव पारित करेल, अशी माहिती ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली.