Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादीच्या सदस्यीय समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आलाय...राजीनामा एकमताने नामंजूर करून पवारांकडे पाठवण्यात आलाय...अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपेपर्यंत पदावरच राहावं असा ठराव पारित करण्यात आलाय...पवार हे देशाचे नेते आहेत...त्यांची राज्यासह देशाला गरज आहे...त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदी राहावं अशी भावना सगळ्यांची आहे...
5 May 2023, 10:26 वाजता
अजित पवार, सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या कार्यालयात
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates अजित पवार काही वेळात पार्टी कार्यालय येथे पोहोचले आहे. काही न भाष्य करता पार्टी कार्यालयात दाखल. तसेच सुप्रिया सुळे सिल्व्हर ओककडून राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयाकडे रवाना झाल्यात. त्या कार्यालायात पोहोचल्यात.
5 May 2023, 10:24 वाजता
शरद पवार कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा भेटणार
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : शरद पवार सकाळी साडेदहा वाजता वाय बी चव्हाण सेंटर येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. सकाळी अकरा वाजता प्रदेश कार्यालयात कमिटी प्रस्ताव पारीत करेल आणि त्यानंतर तो शरद पवार यांना कळविण्यात येईल, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.
5 May 2023, 10:19 वाजता
ठाण्यात पवारांचे बॅनर्स लागले....
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे शहरात 'साहेब' असे पोस्टर लावले आहेत. साहेबांशिवाय पर्याय नाही, असे यावर नमुद करण्या आले आहे. त्याआधी पवार यांनी राजीनामा घ्यावा म्हणून ठाण्यातील कार्यकारणीने आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
5 May 2023, 10:18 वाजता
प्रफुल पटेल प्रस्ताव ठेवणार
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत प्रफुल पटेल प्रस्ताव ठेवणार आहेत. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याबाबत हा प्रस्ताव असणार आहे.
5 May 2023, 10:16 वाजता
पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता?
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक होत आहे. पुढील अध्यक्षाची चाचपणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कालच शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तेच या पदावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता जास्त आहे. परंतु, शरद पवार हे लोकसभा निवडणुकीपर्यंत या पदावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रथमच राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष निवडण्याची शक्यता जास्त आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याच्या अचानक केलेल्या घोषणेने राज्याच्या राजकारणाचा नूरच पालटून गेला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात गोंधळ घातला. तुम्ही आपला निर्णय मागे घ्या असा आग्रह केला. काहींनी तर वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ठिय्या मारला. दोन दिवसांपासून पवार यांची मनधरणी करण्यात येत होती. अखेर काल त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल, असे जाहीर केले. त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी शांत झालेत. यावेळी पवार यांनी दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. आज त्याबाबत महत्त्वाची बैठक होत आहे.