Lockdown : सोलापुरात एक आठवड्याचा कडक लॉकडाऊन जाहीर

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाचा लॉकडाऊनचा निर्णय

Updated: May 6, 2021, 09:46 PM IST
Lockdown : सोलापुरात एक आठवड्याचा कडक लॉकडाऊन जाहीर

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 8 मे रोजी रात्री 8 वाजल्यापासून 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान मेडिकलसह अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.

महापालिका आयुक्त तसेच जिल्हा परिषद सीईओ यांच्या उपस्थितीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सोलापूरची रुग्णसंख्या वाढत असल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाची साखळी मोडण्यासाठी लॉकडाऊन हा एकच पर्याय आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आणायची असेल तर प्रशासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागतो. गरज नसताना देखील लोकं बाहेर पडतात. ज्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.