Lok Sabha Elections First Phase in Maharashtra : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्प्यासाठी मतदान हे 19 एप्रिलला होणार आहे. जागावाटपाचा घोळ अजूनही सुरु असताना दुसरीकडे पहिल्या टप्प्यातील लढती मात्र निश्चित झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा - गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये मतदान होणार आहे. या जागांवर काँग्रेस आणि भाजप शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील चित्र आता स्पष्ट झालंय. (Lok Sabha Elections First Phase in Maharashtra nagpur ramtek Gadchiroli Bhandara Gondia Chandrapur)
नागपूर लोकसभा मतदारसंघात आज काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. संविधान चौक ते कलेक्टर ऑफिसपर्यंत रॅली काढून ठाकरेसह काँग्रेस शक्तीप्रदर्शन करणार आहे. विकास ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते उपस्थित असणार आहे.
राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य दिग्गज नेते मंडळी मुनगंटीवार यांना समर्थन देण्यासाठी चंद्रपुरात येणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज भित्तीशिल्पापासून रॅलीला काढून ही मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहणार आहे.
गडचिरोली लोकसभेतील भाजप उमेदवार अशोक नेते आज उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात भरणार आहे. चंद्रपूरनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थिती असणार आहे. उमेदवारी अर्ज भरल्या जाताना अशोक नेते आणि भाजप कार्यकर्ते आपली ताकद दाखविण्यासाठी रॅली काढणार आहे.
नागपूर - नितीन गडकरी (भाजप) विरुद्ध आ.विकास ठाकरे (काँग्रेस)
रामटेक - राजू पारवे (एकनाथ शिंदेंची शिवसेना) विरुद्ध रश्मी बर्वे (काँग्रेस)
गडचिरोली - अशोक नेते (भाजप) विरुद्ध डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस)
भंडारा - गोंदिया सुनील मेंढे (भाजप) विरुद्ध प्रशांत पडोळे (काँग्रेस)
चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार विरुद्ध आ. प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)