लोकमंगल बायोटेक कंपनी संचालक मंडळावर गुन्हा दाखल

लोकमंगल बायोटेक कंपनीच्या संचालक मंडळावर  गुन्हा दाखल. 

Updated: Aug 27, 2019, 11:43 PM IST
लोकमंगल बायोटेक कंपनी संचालक मंडळावर गुन्हा दाखल title=
संग्रहित छाया

औरंगाबाद : लोकमंगल बायोटेक कंपनीच्या संचालक मंडळावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अप्रमाणित मिश्र खत आढळल्याने शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकमंगलने उत्पादित केलेली मिश्र खते अप्रमाणित आढळलीत. त्यामुळे औरंगाबादच्या जिल्हा परिषद कृषी विभागाने ही कारवाई केली आहे. 

मिश्र खतांचे सहा नमुने अप्रमाणित

लोकमंगल बायोटेक लिमिटेड, सोलापूर यांनी उत्पादित केलेले आणि विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या मिश्र खतांचे सहा नमुने गुणवत्ता तपासणीसाठी घेण्यात आले. तपासणीसाठी घेण्यात आलेले सहापैकी सहा नमुने खत चाचणी प्रयोग शाळेकडून अप्रमाणित घोषित करण्यात आले. त्यामुळेच याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सहकार मंत्र्यांची कंपनी वादात

औरंगाबाद जिल्ह्यातील पिशोर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. आनंद कृषी सेवा केंद्रातील १०२ टन खत कृषी विभागाने विक्री बंद केलंय. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल बायोटेक कंपनीवरील कारवाईने पुन्हा वाद निर्माण झाला आहे. मात्र, आपला याच्याशी काही संबंध नसल्याचे सांगत सुभाष देशमुख यांनी हात झटकले आहेत.