तिरुपतीचा प्रवास सुकर होणार; मुंबईहून सुटणाऱ्या 'या' एक्सप्रेसला मिळणार सोलापुरात थांबा

India Railway Update: सोलापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तिरुपतीला जाण्यासाठी सोलापूरकरांना आणखी एक एक्प्स्रेस मिळाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 11, 2023, 01:05 PM IST
तिरुपतीचा प्रवास सुकर होणार; मुंबईहून सुटणाऱ्या 'या' एक्सप्रेसला मिळणार सोलापुरात थांबा title=
Lokmanya Tilak Terminus to Velankanni express halt on solapur

India Railway Update: तिरुपतीच्या (Tirupati) दर्शनाला कोणाला जायचे नाही? प्रत्येक भाविकाला येथे जाण्याची इच्छा असतेच. आता सोलापूरकरांचा तिरुपतीला जाण्याचा प्रवास सोप्पा होणार आहे. सोलापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्ये रेल्वेने (Central Railway) सोलापूरकरांना (Solapur) आणखी एका रेल्वेचे गिफ्ट दिले आहे. मध्य रेल्वेकडून दक्षिण भारतासाठी आणखी एक रेल्वे सुरू केली आहे. एलटीटी वेलकन्नी (Mumbai LTT-Velankanni) ही नवीन साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. ही नवी एक्स्प्रेस आता सोलापूरमार्गे धावणार आहे. सोलापूरहून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आता सुखाचा होणार आहे. (Indian Railway Update)

या एक्स्प्रेसमुळं तिरुपती चेन्नई येथे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. आठवड्यातील प्रत्येक शनिवार आणि सोमवारी ही गाडी धावणार आहे. दर शनिवारी दुपारी एक वाजता मुंबईहून ही गाडी सुटणार आहेच तर,  पुण्यात दुपारी चार वाजून 55 मिनिटांनी या एक्सप्रेसचा थांबा असणार आहे. तर,  सोलापूर रेल्वे स्थानकात संध्याकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी रेल्वेचे आगमन होणार आहे. 

सोलापूर, धाराशिव, कलबुर्गी परिसरातून मोठ्या संख्येने भाविक तिरुपतीला जात असतात. तिरुपतीला जाणाऱ्या दैनंदिन सर्वच गाड्या हाऊसफुल असतात. मात्र या नवीन गाडीमुळे सोलापूरकरांची सोय होणार आहे. या एक्स्प्रेसमुळं तिरुपतीचा प्रवास आरामदायी होणार आहे. 

दरम्यान, सध्या सोलापूर ते तिरुपती जाण्यासाठी रोज एक गाडी आहे यात आणखी एका गाडीची भर पडली आहे. सोलापूरहून तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळंच रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सध्या सोलापूर ते तिरुपतीसाठी (0143701438) ही गाडी धावत आहे. सोलापूर शहरातून दररोज 1 हजाराहून अधिक भाविक बालाजीच्या दर्शनाला तिरुपतीला जात असतात. त्यामुळं या मार्गावर धावणारी तिरुपती, चेन्नई, मदुराई या तीन गाड्यांच्या तिकिटासा वेटिंगच दाखवतात. त्यामुळं तिरुपतीला जाणाऱ्या गाड्या हाउसफुल्लच दिसतात. जास्त अंतर, कमी खर्चात प्रवास अन् दर्शन होत असल्याने अनेकजण रेल्वेने जाण्याचा पर्याय निवडत आहेत.