close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लोकसभा निवडणूक २०१९ : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम

२९ एप्रिलला येथे निवडणूक होणार आहे.

Updated: Mar 28, 2019, 12:59 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम

दिंडोरी : या मतदारसंघातून २०१४ मध्ये भाजपकडून हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी निवडणूक जिंकली होती. ते लागोपाठ ३ वेळा या मतदारसंघातून निवडून गेले आहेत. पण भाजपने त्यांचा पत्ता कापत डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादीने धनराज महाले यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने बापु बर्डे यांना मैदानात उतरवलं आहे. २९ एप्रिलला येथे निवडणूक होणार आहे.

२०१४ चा निकाल

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हरिशचंद्र चव्हाण यांना ५,४२,७८४ मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांना २,९५,१६५ तर माकपच्या हेमंत वाकचौरे यांना ७२,५९९ बसपाच्या शरद माळी यांना १७,७२४, आपच्या ज्ञानेश्वरी माळी यांना ४,०६७ मते मिळाली होती.

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

उमेदवार

 पक्ष

 मतदान

हरिशचंद्र चव्हाण  भाजप 542784
भारती पवार राष्ट्रवादी 295165
हेमंत वाघेरे कम्युनिस्ट पक्ष 72599
शरद माळी बसपा 17724
नोटा नोटा 10897