लोकसभा निवडणूक २०१९ : नाशिक लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम

नाशिकमध्ये २९ एप्रिलला मतदान होणार आहे.

Updated: Mar 28, 2019, 12:51 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : नाशिक लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम title=

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून समीर भुजबळ आणि हेमंत गोडसे आमने-सामने आहेत. वंचित बहुजन विकास आघाडीने पवन पवार यांना उमेदवारी दिली आहे. नाशिकमध्ये भाजपचे ३, शिवसेनेचे २ तर काँग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये युतीला फायदा होऊ शकतो. नाशिकमध्ये २९ एप्रिलला मतदान होणार आहे.

२०१४ चा निकाल

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना ४,९४,७३५ मते तर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना ३,०७,३९९ मते आणि मनसेच्या डॉ. प्रदीप पवार यांना ६३,०५० मते मिळाली होती. 

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

 

उमेदवार

 पक्ष

 मतदान

हेमंत गोडसे भाजप 494735
छगन भुजबळ राष्ट्रवादी 307399
डॉ. प्रदिप पवार मनसे 63050
दिनकर पाटील बसपा 20896
तानाजी जयभावे कम्युनिस्ट पक्ष 17154