लोकसभा निवडणूक २०१९ : हिंगोली मतदारसंघातील 'रणसंग्राम'

लोकसभा निवडणुकीसाठी हिंगोली मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे.

Updated: Mar 31, 2019, 04:58 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : हिंगोली मतदारसंघातील 'रणसंग्राम' title=

नांदेड : लोकसभा निवडणुकीसाठी हिंगोली मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून काँग्रेसनं सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनचे हेमंत पाटील हे सुभाष वानखेडेंच्या विरोधात उभे आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून मोहन राठोड निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

२०१४ निवडणुकीचे निकाल 

२०१४ साली हिंगोलीमधून काँग्रेसचे राजीव सातव विजयी झाले होते. राज्यात काँग्रेसने जिंकलेल्या २ जागांपैकी ही एक जागा होती. राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंचा १,६३२ मतांनी पराभव केला होता.

२०१४ निवडणुकीची आकडेवारी 

उमेदवार

पक्ष

मिळालेली मतं

राजीव सातव काँग्रेस ४,६७,३९७
सुभाष वानखेडे शिवसेना ४,६५,७६५
चुन्नीलाल जाधव बसपा २५,१४५
डी.बी.नाईक सीपीएम १४,९८६
उत्तमराव राठोड बीएमयूपी ९,७७०

रणसंग्राम | काय आहेत हिंगोलीतल्या समस्या?

रणसंग्राम | हिंगोलीतून आवाज तरुणांचा