अहमदनगर : सुजय विखे-पाटील यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. संग्राम जगताप राष्ट्रवादीचे नगर शहराचे आमदार आहेत. तर भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत. कर्डिले हे संग्राम जगताप यांना मदत करतील असा राष्ट्रवादीचा अंदाज आहे. नगरमधील दंगलीमुळे संग्राम जगताप यांचे नाव चर्चेत आली होते. तरुण चेहरा म्हणून त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. महानगरपालिकेत संग्राम जगताप यांनी सासरे आणि भाजप नेते शिवाजी कर्डिलेंना मदत केली होती. त्यामुळे आता शिवाजी कार्डिले हे देखील त्यांना मदत करतील असा राष्ट्रवादीचा विचार आहे.
अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप या २ तरुणांमध्ये आता सामना रंगणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी खासदार यशवंत गडाख यांचे सुपुत्र प्रशांत गडाख आणि विखे घराण्याचं वैर आहे. त्यामुळे त्यांची मदत देखील संग्राम जगताप यांना मिळू शकते. संग्राम जगताप यांनी महापालिका निवडणुकीत भाजपला मदत केल्यामुळे राष्ट्रवादीने नगरसेवकांचं निलंबन केलं होतं. संग्राम जगताप यांनाही पक्षाने याबाबत जाब विचारला होता. पण यानंतरही संग्राम जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे.