'मोदीच आमचे स्टार प्रचारक कारण..', 'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'; वडेट्टीवारांचा दावा

Loksabha Election 2024 : विदर्भासह राज्यात भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. 

Updated: May 5, 2024, 11:14 AM IST
'मोदीच आमचे स्टार प्रचारक कारण..', 'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'; वडेट्टीवारांचा दावा title=
Loksabha Election 2024 Modi is our star campaigner because. BJP will be cleared from Vidarbha claim of Vijay Wadettiwar

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या 7 मे रोजी होणार आहे. अशात आज मोदीच आमचे स्टार प्रचारक असून विदर्भात भाजपचा सुपडा साफ होणार असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विदर्भातील 10 च्या 10 जागा काँग्रेसचे उमेदवार जिंकणार असा विश्वास वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद बोलून दाखवला. (Loksabha Election 2024 Modi is our star campaigner because BJP will be cleared from Vidarbha claim of Vijay Wadettiwar)

'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी मविआच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केलाय. विदर्भातील 10 च्या 10 जागा जिंकणार असून नितीन गडकरीसुद्धा निवडणूक हरणार आहे, असे सर्व्हेमधून स्पष्ट सांगतो, असं वडेट्टीवार म्हणाले. विदर्भानंतर मराठवाड्यातही तेच चित्र आहे. मराठवाड्यातील 8 जागांवर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी जिंकणार आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय. 

महाराष्ट्रात एकतर्फी ही निवडणूक होताना दिसत असल्याचही ते यावेळी म्हणाले. लोकांचा जल्लोष आणि उत्साह जो पाहिला मिळतोय त्यानुसार राज्यात आम्ही किमान 38 जागा जिंकणार, असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केलाय. 

विजय वडेट्टीवार काय म्हणाले पाहा

'छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची घृणा का?'

कोल्हापूरमध्ये चार चार दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्कामाने आहेत. त्याचवेळी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची महायुतीला घृणा का वाटते असा गंभीर आरोपही वडेट्टीवारांनी केलाय. तो विचार संपण्याचा राग यांच्या डोक्यात आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.