झुकेगा नही! कसब्यात 47 मते मिळवणारे अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

Abhijit Bichukle: हरण्याची मला खंत नाही म्हणत अभिजीत बिचुकले दरवेळेस नव्या दमाने निवडणुकीची तयारी करतात.

Pravin Dabholkar | Updated: Mar 23, 2024, 04:59 PM IST
झुकेगा नही! कसब्यात 47 मते मिळवणारे अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात title=
Abhijit Bichukle Loksabha

Abhijit Bichukle: राज्यातल्या निवडणुका आल्या की मोठमोठे मतदारसंघ आणि त्यात निवडणूक लढवणाऱ्या राजकीय पक्षांबद्दल चर्चा होतात. कोणता नेता कोणत्या पक्षात गेला, मागच्या वेळेस काय आश्वासन दिले? अशा अनेक गप्पा नाक्यानाक्यावर होतात. या सगळ्यात एक चर्चा असते ती म्हणजे अभिजीत बिचुकले यांच्या उमेदवारीची.. हरण्याची मला खंत नाही म्हणत अभिजीत बिचुकले दरवेळेस नव्या दमाने निवडणुकीची तयारी करतात. यावेळेस त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली. 

कसब्याच्या पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या विजयाची चर्चा सुरु होती. त्यावेळेस दुसरीकडे अभिजीत बिचुकलेंना किती मतं मिळाली? असा प्रश्न विचारणारेही अनेकजण होते. कसबा पोट निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंना तब्बल 47 मते मिळाली होती.  तरीही त्यांच्या आत्मविश्वासात कसुभरही कमतरता आली नाही. आता ते पुन्हा सज्ज झाले आहेत. 

आता डॉक्टर बिचुकले 

अभिजीत बीचुकले आता लोकसभेसाठी स्वतःचं नशीब आजमावणार आहेत. विशेष म्हणजे बहुआयामी कलावंत असलेले सातारकर आता डॉक्टर अभिजीत बीचुकले झाले आहेत. त्यांना युनिव्हर्सिटी ऑफ मॅजिक अँड आर्ट्स या विद्यापीठाची मानद डॉक्टरेट काम करण्यात आली आहे. त्याच आनंदात त्यांनी निवडणूक लढणार असल्याची घोषणा केलीये. 

आगामी लोकसभा निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढायची हे अद्याप बिचुकलेंचं ठरलेलं नाहीये. सातारा, कोल्हापूर की पुणे?  यापैकी कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार?  याविषयीची घोषणा आपण लवकरच करणार असल्याचे बिचुकले सांगतात. 

 लक्ष वेधून घेणार 

सदैव चर्चेत असलेले व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीतदेखील लक्ष वेधून घेणार आहेत एवढं मात्र नक्की.