एकाधिकारशाही देशाला घातक,आम्हाला संमिश्र सरकार हवंय- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Modi: महायुतीच्या एकत्र सभा लवकरच सुरु होतील. आम्ही सगळीकडे एकत्रितपणे प्रचार करु असे ठाकरे म्हणाले.

Updated: Apr 13, 2024, 02:06 PM IST
एकाधिकारशाही देशाला घातक,आम्हाला संमिश्र सरकार हवंय- उद्धव ठाकरे  title=
Uddhav Thackeray On Narendra Modi

Uddhav Thackeray: आम्हाला संमिश्र सरकार हवंय. एक व्यक्ती एक पक्ष हे दहा वर्षात दिसून आलंय. महायुतीला पाठींबा देण्यासाठी सर्वजण एकत्र येत आहेत. एकाधिकारशाही देशाला घातक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. जळगावात बीआरएसला मोठा धक्का बसलाय. बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटलांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केलाय. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे.यामुळे जळगावात ठाकरे गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा विजय अधिक मोठा व्हावा, यासाठी सर्वजण एकत्र येत असल्याचे ते म्हणाले. 

हुकुमशहाला स्वीकारणं देशासाठी योग्य नाही. संमिश्र सरकार नको, असे एकेकाळी वाटायच. पण संमिश्र सरकारच्या काळात सरकार चांगल चालतं हे दिसून आल्याचे ते म्हणाले. 

2014, 2019 आणि आताही जनतेला आश्वासन देतायत ते पूर्ण होत नाही. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख, तरुणांना रोजगार, घराघरात पाणी, भ्रष्टाचारमुक्त भारत हे काहीही त्यांना करता आले नाही. महायुतीच्या एकत्र सभा लवकरच सुरु होतील. आम्ही सगळीकडे एकत्रितपणे प्रचार करु असे ठाकरे म्हणाले.

सांगलीतील जागेबाबत महायुती अंतर्गत वादामुळे बॅकफूटवर गेलीय का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी सांगलीत जागा वाटप झालयं. आता तिथल्या कार्यकर्त्यांना त्या नेत्यांनी समजावण गरजेचं असल्याचे ते म्हणाले. 

तसेच विनोद घोसाळकर यांना कॉंग्रेसने आपल्या पक्षातून लढण्याची ऑफर दिल्याबद्दल ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना ते जाणार का घोसाळकरांना विचारा. घोसाळकर कट्टर शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते कॉंग्रेसमध्ये जाऊन लढणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

'देवेंद्र फडणवीस मागे लागल्याने....' नारायण राणेंनी सांगितला भाजप प्रवेशावेळचा 'तो' किस्सा