'भाजपला मतदान, लीड न देणाऱ्याने मला तोंड दाखवू नका' आमदाराकडून कार्यकर्त्यांना धमकीवजा इशारा

Madha Bjp MLA Ram Satpute: माढा मतदार संघात आमदार राम सातपुते यांनी कार्यकर्त्यांना धमकीवजा इशारा दिल्याचे पाहायला मिळत आहे.

Updated: Mar 26, 2024, 10:05 PM IST
'भाजपला मतदान, लीड न देणाऱ्याने मला तोंड दाखवू नका' आमदाराकडून कार्यकर्त्यांना धमकीवजा इशारा title=
Bjp MLA Ram Satpute

सचिन कसबे, झी 24 तास, माढा: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात 7 टप्प्यांमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते वेगाने कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांच्या मिटींग घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे सुरु आहे. दरम्यान माढा मतदार संघात आमदार राम सातपुते यांनी कार्यकर्त्यांना धमकीवजा इशारा दिल्याचे पाहायला मिळत आहे. काय म्हणाले राम सातपुते? सविस्तर जाणून घेऊया.

माढा लोकसभा मतदारसंघात जो भाजपला लीड आणि मतदान देणार नाही त्या कार्यकर्त्याने मला तोंड दाखवू नका, असे विधान आमदार राम सातपुते यांनी केलंय. या माध्यमातून आमदार सातपुतेंनी कार्यकर्त्यांना धमकीवजा इशारा दिल्याचं म्हटलं जातंय. माळशिरस मध्ये सोलापूर लोकसभा भाजप उमेदवार राम सातपुते यांचा कृतज्ञता मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. माढा लोकसभा भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरही  यावेळी उपस्थित होते. 

नव्या ताकदीचा माळशिरसमध्ये उदय

माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांच्याशिवाय राम सातपुते यांनी हजारो समर्थकांची गर्दी जमा केली होती. मोहिते पाटील यांच्याशिवाय नव्या ताकदीचा माळशिरसमध्ये उदय झाल्याचे म्हटले जात आहे. यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठी मदत होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर, महाराष्ट्रात धनंजय मुंडेंना सर्वात मोठी जबाबदारी

मोहिते पाटील यांना मोठा धक्का

राम सातपुते यांचे भाषण चर्चेचा विषय ठरले. मोहिते पाटील माझा परिवार आहे तर भाजप माझा पक्ष आहे.मला पक्षासाठी परिवार सोडवा लागला तरी सोडेन, असे यावेळी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी म्हटले. पहिल्यांदाच आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्या दुरव्यावर मत व्यक्त केले. हा मोहिते पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे उभे राहण्याचे  आवाहन राम सातपुते यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

'राष्ट्रवादीला सोबत घ्यायची गरज नव्हती' म्हणणाऱ्या गोगावलेंना अजित पवारांचे खास शैलीत उत्तर